एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गाडी, बँक खातं, विमा, 1 एप्रिलपासून नियमात बदल काय?
मुंबई: आर्थिक वर्ष 2016-17 चा आजचा शेवटचा दिवस आहे. उद्या म्हणजे 1 एप्रिलपासून 2017-18 या आर्थिक वर्षाला सुरुवात होईल.
उद्यापासून काही नियमात बदल होणार आहेत. या बदललेल्या नियमांमुळे तुमच्या दैनिंदिन जिवनात काय परिणाम होईल? त्यावर एक नजर
1 एप्रिलपासून काय-काय बदलणार?
- मोटार गाड्यांवरील थर्ड पार्टी इन्शुरन्सचा हप्ता जवळपास 50 टक्क्यांनी वाढणार आहे. विमा हप्त्याचे नवे दर लागू होतील.
- विमा नियमन प्राधिकरणाने कार आणि टू व्हीलरसर आरोग्य विमा एजंटच्या कमिशनमध्ये बदल केला आहे. या कारणानेही तुमच्या हप्त्यात 5 टक्के वाढ होत आहे. ही वाढ थर्ट पार्टी मोटर इन्शुरन्सच्या हप्त्यातील वाढीपेक्षा वेगळा असेल.
- भारतीय स्टेट बँकेच्या 5 सहयोगी बँका - स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि स्टेट बँक ऑफ जयपूर या बँका स्टेट बँकेत विलीन होतील. त्यामुळे तुमचं जर या बँकात खातं असेल, तर तुम्ही आता थेट स्टेट बँकेचे खातेदार म्हणून गणले जाल. नव्या व्यवस्थेनुसार भारतीय स्टेट बँकेच्या 23 हजार शाखा आणि 21 हजार एटीएम असतील.
- 1 एप्रिलपासून केवळ 2 लाखांपर्यंतचेच रोख व्यवहाराची सुविधा मिळेल. त्यापेक्षा जास्त रोखीचे व्यवहार केल्यास, तुमचा व्यवहार ज्या रकमेचा असेल, तेवढाच दंड होईल. म्हणजे जर कोणी अडीच लाख रुपये रोख भागवले, तर त्याला अडीच लाख रुपयांचाच दंड होईल.
1 एप्रिलपासून काय स्वस्त, काय महाग?
'जिओ'च्या मोफत ऑफरचा आज शेवटचा दिवस!
जुन्या 1000-500च्या नोटा डिपॉझिट करण्याचा आज शेवटचा दिवस
होंडाच्या टू व्हीलरवर 18 हजारांची सूट, गाड्या खपवण्यासाठी धावाधाव
दोन लाखांपेक्षा अधिकच्या रोख व्यवहारांवर शंभर टक्के दंड
पाच सहयोगी बँका स्टेट बँक ऑफ इंडियात विलीन होणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement