एक्स्प्लोर
'भारत मात की जय'चा, नारा देशातच नव्हे जगात घुमला पाहिजे: भागवत

अहमदाबाद: 'भारत माता की जय'चा नारा केवळ देशात नाही तर संपूर्ण जगात ऐकू आला पाहिजे असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. ते गुजरामधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे दाखले देत देशांर्तगत भेदभाव संपवायला हवा असंही ते म्हणाले. "भारत माता की जय" या घोषणेवरुन झालेल्या वादानंतर मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा या घोषणेचा पुर्नउच्चार केला. दरम्यान, या कार्यक्रमाप्रसंगी पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बॅनरवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो पाहायला मिळाला.
Before You Go
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















