एक्स्प्लोर
पाच सरकारी बँकांना रोटोमॅक कंपनीच्या मालकाकडून 500 कोटीचा चुना
पंजाब नॅशनल बँकेत साडे 11 हजार कोटीच्या घोटाळ्याचे प्रकरण ताजे असतानाच, आता कानपूरमधून पाचशे कोटीपेक्षा जास्त रकमेचा बँक घोटाळा समोर येत आहे.

कानपूर : एकीकडे पंजाब नॅशनल बँकेत साडे 11 हजार कोटीच्या घोटाळ्याचे प्रकरण ताजे असतानाच, आता कानपूरमधून पाचशे कोटीपेक्षा जास्त रकमेचा बँक घोटाळा समोर येत आहे. या घोटाळ्यात रोटोमॅक कंपनीचे मालक विक्रम कोठारी यांचं नाव असल्याची माहिती आहे. विक्रम कोठारी यांनी पाच सरकारी बँकांकडून पाचशे कोटीपेक्षा जास्त कर्ज घेतलं होतं. याला एक वर्ष उलटूनही अद्याप एकही रुपया बँकेकडे जमा केलेला नाही. विशेष म्हणजे, विक्रम कोठारी सध्या कुठे आहेत, याचा कुणालाही पत्ता नाही. कानपूरमधील मालरोडवरील सिटी सेंटरमध्ये रेटोमॅक कंपनीचं ऑफिस आहे. पण ते देखील गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. विक्रम कोठारी यांनी नियम धाब्यावर बसवून कर्ज घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. कोण आहेत विक्रम कोठारी?
- पान परागचे संस्थापक एम.एम.कोठारी यांचे विक्रम कोठारी हे पुत्र आहेत.
- वडिलांच्या मृत्यूनंतर विक्रम कोठारी यांनी स्टेशनरीचा व्यावसाय सुरु केला.
- रोटोमॅक नावाने त्यांनी पेन, स्टेशनरी आमि ग्रीटिंग्स कार्डसचं काम सुरु केलं.
- काही वर्षातच त्यांनी रोटोमॅक नावाची मोठी कंपनी स्थापन केली.
- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी विक्रम कोठारी यांना सन्मानित केलं होतं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























