Road Accident : देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला ; 14 जणांचा जागीच मृत्यू, 27 जण गंभीर
Accident in Assam: आसाममध्ये एका रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 27 जण जखमी झाले आहेत. बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
Road Accident in Assam: आसाममधील (Assam Accident) डेरगावमध्ये भीषण अपघात (Accident Updates) झाला असून अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 27 जण गंभीर जखमी आहेत. बुधवारी (3 जानेवारी) सकाळी 45 जणांना घेऊन जाणारी बस आणि ट्रक यांच्यात भीषण टक्कर झाली आणि अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचलं. तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. बसमधील जखमींना स्थानिक लोकांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं आणि स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. अपघातातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
देवदर्शनाला निघालेल्या बसचा भीषण अपघात
आसाममधील गोलाघाट जिल्ह्यातील डेरगावजवळ बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमधील सर्व 45 जण सहलीसाठी जात होते. आसाम तिनसुकियामधील तिलिंगा मंदिरात दर्शनासाठी जायचं होतं, मात्र वाटेत डेरागाव येथे बस समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. दोन्ही वाहनांची धडक खूप भीषण होती. दोन्ही वाहानांचा चक्काचूर झाला. तसेच, बसमधील 14 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधून प्रवास करणारे इतर 27 जण गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Assam | Several people feared dead and many others were injured after the bus in which they were travelling collided with a truck near the Dergaon area in Assam's Golaghat district, today: Golaghat District Police
— ANI (@ANI) January 3, 2024
स्थानिकांची अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव
बस आणि ट्रकची धडक झाल्यानंतर मोठा आवाज झाला. आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळाच्या दिशेनं धाव घेतली. स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस येण्यापूर्वीच स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केलं. बसमधील जखमींना स्थानिकांनी बाहेर काढलं आणि तात्काळ रुग्णालयात पाठवलं. बसमधील सर्व प्रवाशांना जवळच असलेल्या जोरहाट मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. त्यापैकी डॉक्टरांनी 14 जणांना मृत घोषित केलं आणि इतर 27 जणांवर उपचार सुरू आहेत.
कोळशानं भरलेल्या ट्रकला धडकली बस
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण 41 प्रवासी प्रवास करत होते. देवदर्शनासाठी निघालेली बस आसममधील डेरगावजवळ एका कोळशानं भरलेल्या ट्रकवर जाऊन धडकली. ट्रक मार्गेरिटा येथून येत होता आणि त्यात कोळसा भरला होता. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. अपघाताच्या वेळी दाट धुकं होतं.