एक्स्प्लोर

Road Accident: एक डुलकी अन् जीवाशी खेळ! सर्वाधिक रस्ते अपघात 'या' वेळेतच होतात- काय आहेत कारणं 

Car Accident Reason: NCRB च्या अहवालानुसार देशात दरवर्षी सुमारे 4,50,000 अपघात होतात. यापैकी सुमारे 1,50,000 लोकांचा मृत्यू होतो आणि अनेक लोक अपंग होतात.

Car Accident Reason: क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या (Rishabh Pant Car Accident ) कार अपघातानंतर पुन्हा एकदा रस्ते अपघातांवरुन ( road accident) चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत जी कार चालवत होते ती कार भरधाव वेगात होती आणि त्याला झोप लागल्याने हा अपघात झाला. भारतात दरवर्षी मोठ्या संख्येने लोक रस्ते अपघातांचे बळी ठरतात. NCRB च्या अहवालानुसार देशात दरवर्षी सुमारे 4,50,000 अपघात होतात. यापैकी सुमारे 1,50,000 लोकांचा मृत्यू होतो आणि अनेक लोक अपंग होतात. एक डुलकी बऱ्याचदा अपघाताला कारणीभूत ठरते.  दुपारी 12 ते 3 आणि दुपारी 2 ते 5 या वेळेत सर्वाधिक रस्ते अपघात होत असल्याचे मानले जाते. 

झोपेमुळं होतात सर्वाधिक रस्ते अपघात- अभ्यासातून निष्कर्ष

1. जागतिक बँकेच्या  (World Bank) अभ्यासात असे समोर आले आहे की,  स्लीप डिसऑर्डरमुळं रस्ते अपघाताचा धोका 300 टक्क्यांनी वाढतो.
2. दुसरा अभ्यास डॉ. कीर्ती महाजन आणि 2021 मध्ये आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक नागेंद्र वेलागा यांचा आहे. या अभ्यासात त्यांना असे आढळून आले की, जे ड्रायव्हर 5 तासांपेक्षा कमी झोप घेतात त्यांचा अपघात होण्याची सर्वाधिक शक्यता असते.
3. तीन वर्षांपूर्वी 2020 मध्ये, केरळच्या परिवहन अधिकाऱ्यांना एका सर्वेक्षणात असे आढळून आले की महामार्गावरील 40% अपघातांना नीट झोप न घेणारे चालक जबाबदार आहेत. म्हणजे त्यांची झोप पूर्ण होत नाही.
4. चौथा आणि शेवटचा अभ्यास 2019 मध्ये सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटने केला होता. हा अभ्यास 300 किलोमीटरच्या आग्रा-लखनौ एक्सप्रेसवेवर झाला. समोर आलेल्या निकालांनुसार, 40% रस्ते अपघात ड्रायव्हरच्या झोपेच्या अभावामुळे होतात.

या वेळांमध्ये सर्वाधिक अपघात होतात

बहुतेक कार अपघात दुपारी 12 ते 3 या वेळेत होतात. कारण जेवणानंतर झोप येते.

पहाटे 2 ते पहाटे 5 या वेळेत गाढ झोपेची वेळ असल्याने वाहनचालकांची सतर्कता कमी होते आणि बहुतांश अपघात होतात.

झोपेमुळे रस्ते अपघात का होतात

1. झोपेच्या कमतरतेमुळे, गाडीचे ब्रेक लावणे, ऍक्सिलेटरवरून पाय काढणे किंवा वेग कमी करणे यावरील कंट्रोल कमी होतो, त्यामुळं नियंत्रण सुटतं.
2. रात्रीच्या वेळी प्रोफेशनल ड्रायव्हिंग करणाऱ्या बहुतेक ड्रायव्हर्सना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण किंवा ड्रायव्हिंगचा अनुभव नसतो.
3. असे बरेच लोक आहेत ज्यांना असे वाटते की रात्री गाडी चालवल्याने ते लवकर डेस्टिनेशन पोहोचतील कारण त्यावेळी रहदारी कमी असते. अशा स्थितीत ते भरधाव वेगाने वाहने चालवतात आणि त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते.
4. असे काही लोक आहेत जे दिवसा चांगले ड्रायव्हिंग करतात, परंतु रात्री अनुभव नसल्यामुळे त्यांना झोप लागते आणि अपघाताचा धोका वाढतो.
 
हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

व्हिडीओ

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget