एक्स्प्लोर
कोणत्याही वाटाघाटीशिवाय वैमानिकाला सुरक्षित सोपवा, भारताने पाकिस्तानला खडसावलं
भारत-पाकिस्तान सीमेवर अतिशय तणाव आहे. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर आज (28 फेब्रुवारी) राजकीय, कूटनीती आणि रणनीतींचा वेग वाढला आहे.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या तणावादरम्यान पाकिस्तानने नवी चाल खेळली आहे. जर वैमानिकाला सोडल्याने दोन्ही देशांमधील तणाव कमी होणार असेल तर आम्ही यावर विचार करण्यासाठी तयार आहोत. शिवाय यासाठी इम्रान खान भारताच्या पंतप्रधानांना फोन करण्यासही तयार आहे, असं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं. मात्र भारताने याचं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालय म्हणालं की, "वैमानिकाची लवकरच सुटका व्हायला हवी, वाटाघाटाची प्रश्नही उपस्थित होत नाही."
"आमच्या वैमानिकाला तातडीने सोपवा, आम्हाला या प्रकरणात कोणतीही वाटाघाटी करायची नाही. जर पाकिस्तानला सौदेबाजी करायची असेल, तर आम्ही करणार नाही. आम्ही पाकिस्तानला पुरेसे पुरावे दिले आहेत. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाच्या भेटीसाठी कॉन्सूल अॅक्सेस मागितलेला नाही, त्याची तातडीने सुटका करण्यास सांगितलं आहे. बातचीत करायची असेल तर इम्रान खान यांनी विश्वासाचं वातावरण निर्माण करावं." तिन्ही सैन्यदल प्रमुख, रॉ आणि आयबी प्रमुख यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत भारत सरकारने हे विधान केलं.
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाच्या वडिलांचं देशवासियांना भावूक पत्र
वाटाघाटी नाही, वैमानिकाला सोडा
सूत्रांच्या माहितीनुसार, "पाकिस्तान कंधारसारखा दबाव बनवण्याचा प्रयत्न करत आहे. पण भारत कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटीला तयार नाही." "भारताने पाकिस्तानच्या कोणत्याही नागरिक किंवा सैन्याच्या ठिकाणांवर हल्ला केला नव्हता. पण पाकिस्तान भारतीय सैन्याच्या कॅम्पला लक्ष्य बनवून तणाव वाढवण्याचं काम करत आहे. भारताने जाणीवपूर्वक नियंत्रण रेषा पार केली नव्हती. युद्धसदृश परिस्थिती निर्माण करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न भारताने हाणून पाडले," असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं.
पठाणकोट आणि मुंबई हल्ल्यानंतरही भारताने पाकिस्तानला अनेक पुरावे दिले होते. पण कोणतीही कारवाई झाली नाही. दहशतवादी पकडले गेले आणि ऑडिओही दिले, पण पाकिस्तानने सातत्याने इन्कार केला. पुलवामा हल्ल्याच्या मागे जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याचाही पाकिस्तान मान्य करत नाही.
भारत-पाकिस्तान सीमेवर अतिशय तणाव आहे. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर आज (28 फेब्रुवारी) राजकीय, कूटनीती आणि रणनीतींचा वेग वाढला आहे.
भारताने पाडलेल्या पाकिस्तानच्या F16 विमानाचे अवशेष सापडले
तिन्ही सैन्यदलाची पत्रकार परिषद
भारतामध्ये सामान्यत: भारतीय सैन्य तणावाच्या वेळी पत्रकार परिषद घेत नाही. त्यामुळे या पत्रकार परिषदेबाबत अटकळ बांधली जात आहे. आज संध्याकाळी पाच वाजता तिन्ही दलाची आज संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. आतापर्यंत पाकिस्तानविरुद्धच्या कारवाईबाबत परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतून माहिती दिली जात आहे. पण ही पहिली वेळ असेल, जेव्हा तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख एकत्रिक पक्षकार परिषद घेतील. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागलं आहे.
ट्रम्प काय म्हणाले?
दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील तणाव संपण्याचे संकेत दिले आहेत. उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनसोबत शिखर परिषदेसाठी व्हिएनाममध्ये उपस्थित अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान तणावबाबत मोठे संकेत दिले आहे. ट्रम्प म्हणाले की, "माझ्या मते, भारत-पाकिस्तानच्या संघर्षावर चांगली बातमी येणार आहे. आम्हीही या बातचीतमध्ये सामील आहोत. आम्ही त्यांना रोखणार. चांगली बातमी येईल, ज्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये दशकांपासून सुरु असलेला तणाव लवकरच संपेल," अशी अपेक्षा आहे.
संबंधित बातम्या
जिनिव्हा करार : पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाला परत आणण्याचा मार्ग
पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय वायूसेनेच्या वैमानिकाचे फोटो, व्हिडिओ शेअर करु नकापाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं भारतासमोर लोटांगण, चर्चेच्या माध्यमातून तोडग्याची विनंती
भारतीय वायुसेनेचा एक वैमानिक बेपत्ता असल्याची परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला, बडगाममधील चॉपर पाडलं नसल्याची कुबली
पाकिस्तानी मीडियात खोट्या बातम्यांचा पाऊस, भारतीय विमानांना धक्काही नाही
डरपोक पाकड्यांचा डाव उधळला, जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडलं
...म्हणून आम्ही पाकिस्तानमध्ये हवाई हल्ला केला, सुषमा स्वराज यांनी सांगितली कारणं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement