बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची सुटका, गोध्रा जळीतकांडवेळी घडली होती घटना
Bilkis Bano Case: बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व 11 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. या सर्वांना गोध्रा येथील सबजेलमध्ये ठेवण्यात आले होते.
Bilkis Bano Case: बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व 11 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. या सर्वांना गोध्रा येथील सबजेलमध्ये ठेवण्यात आले होते. यांची गुजरात सरकारच्या माफी योजनेंतर्गत तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. हे दोषी 2002 मध्ये बिल्कीस बानोवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. गोध्रा ट्रेन आगीच्या घटनेनंतर गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचारात मार्च 2002 मध्ये गर्भवती बिल्कीस बानोवर सामूहिक बलात्कार झाला होता. या हिंसाचारात त्यांच्या कुटुंबातील सात जणांचाही मृत्यू झाला होता. तर कुटुंबातील इतर सहा सदस्य कसेतरी पळून जाण्यात यशस्वी झाल्याने त्यांचे प्राण वाचले.
मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने 21 जानेवारी 2008 रोजी बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणात 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या सर्वांवर बिल्कीस बानोवर बलात्कार आणि त्यांच्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या केल्याचा आरोप होता. नंतर मुंबई उच्च न्यायालयानेही विशेष सीबीआय न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
जन्मठेपेची शिक्षा झालेल्या या सर्व दोषींनी 15 वर्षे तुरुंगवास भोगला होता. यानंतर एका कैद्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आपली मुदतपूर्व सुटकेसाठी याचिका दाखल केली. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला राज्य सरकारकडून त्यांना माफ करता येईल का, हे पाहण्याचे निर्देश दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गुजरात सरकारने एक समिती स्थापन केली. पंचमहालचे जिल्हाधिकारी सुजल मेत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती. या समितीने सर्व 11 आरोपींना माफी देण्याचा निर्णय एकमताने घेतल्याचे त्यांनी सांगितले. समितीच्या या निर्णयाची माहिती राज्य सरकारला देण्यात आली. यानंतर या सर्वांना तुरुंगातून सोडण्याचे आदेश जारी करण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या:
IndiGo Flight Delayed : 'यू ऑर बॉम्बर'...तरुणीचा बॉयफ्रेण्डला मेसेज आणि इंडिगो विमानाचं उड्डाण सहा तास रखडलं!
Bihar Cabinet Expansion : नितीश कुमारांचा मंत्रिपद वाटपाचा फॉर्म्युला तयार, जाणून घ्या विधानसभा अध्यक्षपद कोणत्या पक्षाला मिळणार
Bihar Congress : मंत्रीपदावरुन काँग्रेसमध्ये वाद, सन्मानजनक मंत्रीपदं मिळावेत अन्यथा..., काँग्रेसची थेट धमकी