एक्स्प्लोर
'या' कारणांमुळे नव्या काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीस विलंब होतोय
राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्याला आज 50 दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु नव्या अध्यक्षांच्या निवडीबाबत पक्षात अद्याप गोंधळाची स्थिती कायम आहे.

Getty Images)
नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्याला आज 50 दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु अद्याप काँग्रेसमधील गोंधळाची स्थिती कायम आहे. काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण? या प्रश्नाचे उत्तर सापडलेले नाही. तर दुसरीकडे वेगवेगळ्या राज्यांमधल्या गटबाजीने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे काँग्रेस आयसीयूत गेली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राहुल गांधी यांचा उत्तराधिकारी कोण? 50 दिवस पूर्ण झाले तरी या एका प्रश्नाचे उत्तर काँग्रेसला सापडलेले नाही. 25 मे रोजी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत राहुल यांनी राजीनामा दिला. परंतु नव्या अध्यक्षपदाच्या निवडीची कोणतीही हालचाल दिसत नाही. अध्यक्षपदाचा पेच सोडवण्यासाठी सर्वप्रथम काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलावणे आवश्यक आहे. परंतु ही बैठक बोलावण्याचा अधिकार कोणाला आहे? यावरुन पक्षात घोळ सुरु आहे.
काँग्रेस वर्किंग कमिटी ही पक्षामध्ये निर्णय घेणारी सर्वोच्च समिती आहे. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर कुठल्याही हंगामी अध्यक्षाची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे वर्किंग कमिटीची बैठक कोण बोलावणार?हा एक वेगळाच प्रश्न आहे.
संघटन महासचिव म्हणून के. सी. वेणुगोपाल यांनी वर्किंग कमिटीची बैठक बोलवायला हवी, परंतु वेणुगोपाल वर्किंग कमिटीत फारच ज्युनियर आहेत. वर्किंग कमिटीत सर्वात ज्येष्ठ सरचिटणीसांकडे हा अधिकार आहे, असे काहींचे म्हणणे आहे. परंतु त्यातही दोन प्रश्न आहेत. सलगचा काळ मोजला तर सर्वात जास्त काळ सरचिटणीस आहेत मुकूल वासनिक, परंतु गुलाम नबी आझाद यांचा एकूण कार्यकाळ त्यांच्यापेक्षा जास्त आहे, परंतु तो सलग नाही.
काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यासाठी वर्किंग कमिटीच्या सदस्यांकडून बंद पाकिटात चार नावे मागवण्यात आली होती. परंतु जोवर ही बैठक बोलावली जात नाही, तोवर पुढचे पाऊल पडणार नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसच्या सत्तेला सुरुंग लागल्याने ही बैठक काहीशी लांबणीवर पडल्याचे सांगितलं जात आहे.
गेल्या काही दिवसांत काँग्रेसला धक्का देणाऱ्या घटना
1. राहुल गांधी यांच्या राजीनाम्याने हायकमांडचा दिल्लीतला लगाम ढिला पडला आहे. त्याचवेळी अनेक राज्यांत गटबाजीनं डोकं वर काढलंय.
2. कर्नाटकात 12 आमदारांनी बंडखोरी केली.
3. गोव्यात रातोरात 10 आमदार भाजपमध्ये सामील झाले.
4. पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासोबतच्या वादामुळे नवज्योतसिंह सिद्धू यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
5. दिल्लीत अनेक काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांच्याविरोधात जाहीर पत्रक काढले.
6. मुंबई काँग्रेसमध्ये मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यावरुन संजय निरुपम यांनी जाहीर तोंडसुख घेतले
50 दिवस उलटूनही कॉंग्रेसला पक्षाध्यक्ष मिळेना, राहुल अद्याप राजीनाम्यावर ठाम
दिल्लीत अध्यक्षपदाची स्थिती स्पष्ट होत नाही, तोवर हे चित्र बदलण्याची आशा नाही. अध्यक्षपदासाठी काही दलित चेह-यांचा विचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु त्यासोबत अध्यक्षपदासाठी तरुण तुर्क विरुद्ध म्हातारे अर्क असाही एक छुपा संघर्ष सुरु आहेच.
राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींनी ट्विटर अकाऊंटवर स्वतःच्या नावापुढे काँग्रेस अध्यक्षपद काढून फक्त खासदार एवढेच पद लावले आहे. परंतु दरम्यानच्या काळात छत्तीसगढ, महाराष्ट्रात नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नेमणुकाही झाल्या आहेत. त्यामुळे हे निर्णय नेमके कुणाच्या नावाने होत आहेत, हेदेखील समजू शकले नाही.
महाराष्ट्र, हरियणा, झारखंड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे पक्षाला येणाऱ्या काळात अनेक नव्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे.
राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर पक्षाला घरघर | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
