Real Estate Sentiment Index | चौथ्या तिमाहीत रिअल इस्टेट क्षेत्रासाठी आशादायक वातावरण
गेल्या वर्षी कोरोनामुळे रियल इस्टेट क्षेत्राला मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं होतं. डिसेंबरच्या अखेरीपर्यंत मागणीमध्ये पुन्हा वाढ झाल्याने या क्षेत्रात आता आशादायक वातावरण निर्माण झालं आहे. याबाबत Real Estate Sentiment Index प्रसिद्ध झाला आहे.
मुंबई: रिएल इस्टेट क्षेत्रासाठी एक आनंदाची बातमी आहे. 2020 च्या चौथ्या तिमाहीमधील (ऑक्टोबर - डिसेंबर 2020) 27 वा नाइट फ्रँक-फिक्की-एनएआरईडीसीओ रिअल इस्टेट सेंटिमेण्ट इन्डेक्स (Real Estate Sentiment Index) प्रसिद्ध झाला आहे. या सर्व्हेक्षणानुसार पहिल्यांदाच चौथ्या तिमाहीमध्ये 54 गुणांसह या क्षेत्राने आशावादी विभागात प्रवेश केला आहे. त्यामुळे पुढच्या सहा महिन्यामध्ये या क्षेत्रामध्ये सकारात्मक मागणी निर्माण होण्याची आशा आहे.
गेल्या एप्रिल-जून 2020 च्या 31 गुणांच्या तुलनेत सध्याचा इन्डेक्स हा उच्च स्तरावर आहे. भागधारकांच्या संदर्भात डेव्हलपर्स व नॉन-डेव्हलपर्सनी (बँका, एनबीएफसी व पीई फंड्स) 2020 च्या चौथ्या तिमाहीमधील भावी सेंटिमेण्ट स्कोअरमध्ये सुधारणा केली आहे.
गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात रियल इस्टेट क्षेत्राला मोठा फटका बसला होता. जून 2018 च्या तुलनेत जून 2019 साली रियल इस्टेट क्षेत्राचे 80 टक्के नुकसान झालं होतं. त्यानंतर पुढच्या तीन महिन्यात, डिसेंबरपर्यंत राहत्या घरांची आणि कार्यालयीन जागेसाठी मागणी वाढल्याचं दिसून आलं. महाराष्ट्र सरकारने स्टॅम्प ड्यूटीमध्ये केलेली कपात, कमी व्याजदर, विकसकांनी राबवलेल्या अनेक आकर्षक योजना या सारख्या विविध कारणामुळे पुन्हा एकदा या क्षेत्रामध्ये आशादायक वातावरण निर्माण झाल्याचं पहायला मिळालं.
सामान्य माणसांंसाठी घरांच्या किंमती कमी होणार का? : आमदार आशिष शेलार
या क्षेत्राचा इन्डेक्स हा या वर्षाच्या अखेरपर्यंत 65 गुणांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. फ्यूचर सेंटिमेण्ट इन्डेक्स (Future Sentiment Index) ने देखील 2020 च्या तिसऱ्या तिमाहीमधील 52 गुणांपासून 2020 च्या चौथ्या तिमाहीमध्ये 65 गुणांपर्यंत प्रबळ वाढीची नोंद केली. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या पश्चिमी भागातील फ्यूचर सेंटिमेण्ट इन्डेक्समध्ये लक्षणीय वाढ दिसण्यात आली. या विभागाचे फ्यूचर सेंटिमेण्ट 2020 च्या तिसऱ्या तिमाहीमधील 47 गुणांवरून 2020 च्या चौथ्या तिमाहीमध्ये 66 गुणांपर्यंत वाढले
नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणाले, ''नवीनच करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार असं दिसून येतंय की या क्षेत्रासाठी आगामी काळ हा आशादायक आहे. नवीन वर्षात या क्षेत्राची सकारात्मक सुरुवात करताना आगामी महिन्यांमध्ये प्रमुख आर्थिक निर्देशकांवर बारकाईने लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. सोबतच कोरोना लसीचा विकास आणि लोकांसाठी लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हे दोन घटक आगामी महिन्यांमध्ये रिअल इस्टेट विभागाची कामगिरी मोठ्या प्रमाणात निर्धारित करतील.''
बिल्डरांना मोठा दिलासा, प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर
रिएल इस्टेट क्षेत्रासाठी करण्यात येणाऱ्या या सर्व्हेक्षणामध्ये 50 पेक्षा जास्त अधिक गुण हे या क्षेत्राला आशावादी असल्याचं सांगतात. जर हे गुण 50 असतील तर समान किंवा तटस्थ चित्र आहे असं समजलं जातं आणि 50 पेक्षा कमी गुण असतील तर या क्षेत्रात 'निराशावाद' आहे असं समजण्यात येतं.
नाइट फ्रँक काय आहे? नाइट फ्रँक (Knight Frank) ही एक जागतिक स्तरावरील आघाडीची मालमत्ता सल्लागार कंपनी आहे. लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या नाइट फ्रँकचे 20 हजार कर्मचारी जगातील 60 बाजारपेठांतील 488 हून अधिक कार्यालयांमधून काम करत आहेत. हा समूह व्यक्तीगत मालक व ग्राहक ते प्रमुख विकासक, गुंतवणूकदार आणि कॉर्पोरेट भाडेकरु यांना सल्ला देता.
भारतात नाइट फ्रँकचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे आणि बंगळुरु, दिल्ली, पुणे, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि अहमदाबाद या शहरांमध्ये 1400 हून अधिक तज्ज्ञ कर्मचारी या कंपनीसाठी काम करत आहेत. बळकट संशोधन आणि विश्लेषणाचे पाठबळ असलेले हे तज्ज्ञ विविध विभागांत (निवासी, व्यावसायिक, रिटेल, हॉस्पिटॅलिटी, जमीन व भांडवल) सल्ला, मूल्यांकन आणि कन्सल्टन्सी सेवा पुरवतात. त्याचप्रमाणे फॅसिलिटी व्यवस्थापन व प्रकल्प व्यवस्थापनाच्या सेवाही पुरवतात.
'राज्यातील ग्रामीण भागातील रस्ते दर्जेदार होणार', वाचा-आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय