एक्स्प्लोर
Advertisement
आरबीआयकडून 20 रुपयांची नवी नोट जारी, नोटेवर महाराष्ट्रातील वेरुळची लेणी
वीस रुपयांची ही नवी नोट हिरवट पिवळ्या रंगाची आहे, नोटेच्या मागील बाजूस सांस्कृतिक वारसा असलेल्या महाराष्ट्रातील वेरुळच्या लेणीचे चित्र आहे.
नवी दिल्ली : भारतीय चलनात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून लवकरच महात्मा गांधींच्या नव्या रुपातील 20 रुपयांची नोट दाखल करण्यात येणार आहे. नवीन वैशिष्ट्ये तसेच नव्या रंगातील ही नोट असणार आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने नोटबंदीनंतर 500 आणि 2000 रुपयांच्य नव्या नोटा बाजारात आणल्या होत्या. त्यानंतर 200,100,50 आणि 10 रुपयांच्याही नव्या नोटा चलनात आणल्या आहेत.
आरबीआयच्या वेबसाईटवर या नोटेचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच या नोटेच्या वैशिष्ट्यांबाबत माहितीही देण्यात आली आहे. वीस रुपयांची ही नवी नोट हिरवट पिवळ्या रंगाची आहे, नोटेच्या मागील बाजूस सांस्कृतिक वारसा असलेल्या महाराष्ट्रातील वेरुळच्या लेणीचे चित्र आहे. या नोटेवर रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी असणार आहे.
'महात्मा गांधींच्या नव्या रुपातील 20 रुपयांची नोट आरबीआयकडून जारी करण्यात येत आहे. नव्या नोटा चलनात आल्यानंतरही सध्या बाजारात असलेल्या वीस रुपयांच्या जुन्या नोटा देखील बाजारात असणार आहे', अशी माहिती आरबीआयच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
सोलापूर
व्यापार-उद्योग
Advertisement