एक्स्प्लोर
RBI गव्हर्नरपदाचा कार्यकाळ वाढवण्यास तयार, पण सरकारशी एकमत नाही: राजन
नवी दिल्लीः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन हे पदाचा कार्यकाळ वाढवण्यासाठी तयार होते, मात्र सरकारशी एकमत न झाल्यामुळे निवृत्तीचा निर्णय घेतला, असा खुलासा राजन यांनी स्वतः केला आहे. गव्हर्नरपदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी राजन यांनी 'एबीपी न्यूज'ला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली.
राजन यांचा कार्यकाळ 5 सप्टेंबर रोजी संपत आहे. राजन यांची कारकीर्द कधी कार्यकाळ वाढवण्याच्या कारणावरुन तर कधी सरकारच्या धोरणांना विरोध केल्यामुळे चर्चेत आली. मात्र राजन यांनी स्वतःच आपण गव्हर्नरपदाचा कार्यकाळ वाढवणार नसल्याचं स्पष्ट केलं. राजन यांना अर्थशास्त्रातील जागतिक स्तरावरील एक प्रभावशील आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं.
राजन यांच्या मुलाखतीमधील महत्वाचे मुद्देः
- किरकोळ महागाई दराचं लक्ष्य निश्चित केल्यामुळे फायदा.
- सातव्या वेतन आयोगामुळे महागाई वाढण्याची शक्यता.
- जीएसटीमुळे एकदाच महगाई वाढणार. वेळावेळा महागाईचा त्रास नसेल.
- सरकारचं महागाईविरुद्ध युद्ध सुरुच आहे.
- सहकारी बँकांच्या कामकाजात सुधारणा गरजेची.
- सरकारच्या कोणत्याही धोरणाला कधी विरोध केला नाही.
- गव्हर्नरपदाच्या कार्यकाळाबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला.
- आर्थिक मुद्द्यांशिवाय इतर कुठल्याही मुद्द्यावर कधी भाष्य केलं नाही.
- विकासाच्या मुद्द्यावर सरकारला जाब विचारणं चुकीचं नाही.
- एखाद्या धोरणाला विरोध असल्यास अर्थमंत्र्यांशी चर्चा केली. सार्वजनिक ठिकाणी कधी भाष्य केलं नाही.
- शिक्षणापासून जास्त काळ दूर राहू शकत नाही.
- सरकारशी बातचीत केल्यानंतर शिक्षण क्षेत्रात परतणार असल्याची माहिती विद्यापीठाला दिली.
- कुटुंबाला माझ्या व्यवसायिक आयुष्याशी जोडणं अयोग्य.
- कुटंबाला सध्याचा वेळ देणार असून 4 सप्टेंबरनंतर सुट्टीवर जाणार.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement