एक्स्प्लोर

रेशन कार्डवरील मोफत तांदूळ बंद; मसाल्यासह आता या 9 गोष्टी मिळणार, सरकारच्या योजनेत मोठा बदल

Ration Card  Scheme : लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी केंद्र सरकारने रेशन कार्ड योजनेमध्ये काहीसा बदल केला आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत. केंद्र सरकार सर्व रेशन कार्डधारकांना मोफत रेशन योजनेंतर्गत रेशन पुरवते. मात्र आता त्यात मोठा बदल झाला आहे. 

या आधी सरकारकडून रेशन कार्डधारकांना मोफत तांदूळ देण्यात येत होतं. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयानुसार मोफत तांदूळ मिळणार नाही. मोफत तांदळाऐवजी आता सरकार इतर 9 जीवनावश्यक गोष्टी देणार आहे. 

रेशन कार्डवर आता या गोष्टी मिळणार

केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास 90 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते. यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे. त्याव्यतिरिक्त गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारेल अशी सरकारला आशा आहे. 

रेशन कार्ड कसे काढणार? 

जर तुम्ही रेशन कार्डसाठी पात्र असाल आणि अजूनही रेशन कार्ड काढले नसेल तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या अन्न व पुरवठा विभागाच्या कार्यालयात जावे लागेल. तसेच अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून देखील अर्ज डाउनलोड करू शकता.

तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या प्रविष्ट करावी लागेल. यासोबतच तुमच्याकडून संबंधित कागदपत्रे मागितली गेली असतील तेही अर्जासोबत जोडावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज आणि संबंधित कागदपत्रे घेऊन तुमच्या जवळच्या रेशनिंग कार्यालयात जमा करावी लागतील.

संबंधित अधिकारी तुम्ही दिलेल्या माहितीची आणि तुमच्या अर्जाची पडताळणी करेल. त्यानंतर तो त्यावर पुढील प्रक्रिया करेल. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड तयार होईल आणि त्यावर तुम्हाला मोफत रेशन मिळू शकेल.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharashiv: मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडवत केली घोषणाबाजी, मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटच्या मागणीला जोर
मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडवत केली घोषणाबाजी, मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटच्या मागणीला जोर
Osama Bin Laden Son Hamza : लादेनचा मुलगा हमजा अजूनही जिवंत; करत असलेल्या तयारीने अमेरिकेपासून युरोपपर्यंत धडकी भरली!
लादेनचा मुलगा हमजा अजूनही जिवंत; करत असलेल्या तयारीने अमेरिकेपासून युरोपपर्यंत धडकी भरली!
Chandrakant Patil: सगेसोयरेचा कायदा 2017 सालीच लागू, देवेंद्रजींनी केला; मंत्री चंद्रकांत पाटलांचा बार्शीतून दावा
सगेसोयरेचा कायदा 2017 सालीच लागू, देवेंद्रजींनी केला; मंत्री चंद्रकांत पाटलांचा बार्शीतून दावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2024 | शनिवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Girish Mahajan Vs Sanjay Raut : सगळ्यांना असच पळून जावं लागेल, संजय राऊतांची टीकाABP Majha Headlines : 7 PM : 14 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सChhagan Bhujbal On Manoj Jarange : पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला तेव्हा जरांगे तिथून निघून गेलाEknath Shinde on Maratha Reservation : मनोज जरांगे आणि विशेष अधिवेशनावर एकनाथ शिंदे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv: मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडवत केली घोषणाबाजी, मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटच्या मागणीला जोर
मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडवत केली घोषणाबाजी, मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटच्या मागणीला जोर
Osama Bin Laden Son Hamza : लादेनचा मुलगा हमजा अजूनही जिवंत; करत असलेल्या तयारीने अमेरिकेपासून युरोपपर्यंत धडकी भरली!
लादेनचा मुलगा हमजा अजूनही जिवंत; करत असलेल्या तयारीने अमेरिकेपासून युरोपपर्यंत धडकी भरली!
Chandrakant Patil: सगेसोयरेचा कायदा 2017 सालीच लागू, देवेंद्रजींनी केला; मंत्री चंद्रकांत पाटलांचा बार्शीतून दावा
सगेसोयरेचा कायदा 2017 सालीच लागू, देवेंद्रजींनी केला; मंत्री चंद्रकांत पाटलांचा बार्शीतून दावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2024 | शनिवार
होय, मी मध्यरात्री 2.30 वाजता अंतरवालीत गेलो, जरांगेंना भेटलो; रोहित पवाराचं भुजबळांना चॅलेंज
होय, मी मध्यरात्री 2.30 वाजता अंतरवालीत गेलो, जरांगेंना भेटलो; रोहित पवाराचं भुजबळांना चॅलेंज
Vijay Wadettiwar : चंद्रपुरात वाद रंगला असतानाच विजय वडेट्टीवार थेट दिल्लीत बैठकीला पोहोचले; वरिष्ठांच्या भेटीगाठीनंतर काय म्हणाले?
चंद्रपुरात वाद रंगला असतानाच विजय वडेट्टीवार थेट दिल्लीत बैठकीला पोहोचले; वरिष्ठांच्या भेटीगाठीनंतर काय म्हणाले?
Faridabad Rain: दुर्दैवी...रेल्वे पुलाखाली पाण्यात बुडाली SUV कार; बँक मनेजरसह कॅशियरचा बुडून मृत्यू
दुर्दैवी...रेल्वे पुलाखाली पाण्यात बुडाली SUV कार; बँक मनेजरसह कॅशियरचा बुडून मृत्यू
Sanjay Raut : आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
Embed widget