एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
न्या. रंजन गोगोई बनणार भारताचे नवे सरन्यायाधीश
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सरन्यायाधीश पदासाठी रंजन गोगोई यांच्या नावाची शिफारस सरकारकडे केली आहे.
नवी दिल्ली : न्यायमूर्ती रंजन गोगोई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती जवळपास निश्चित मानली जात आहे. विद्यमान सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सरन्यायाधीश पदासाठी रंजन गोगोई यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारच्या विधी मंत्रालयाकडे केली आहे.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या शिफारशीला केंद्र सरकार अंतिम मंजूर देईल. न्यायमूर्ती गोगोई 3 ऑक्टोबरला सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील अशी माहितीही सूत्रांकडून दिली जात आहे.
ज्येष्ठ न्यायमूर्तींना सरन्यायाधीशपदी नियुक्त करण्याची परंपरा आहे. मात्र औपचारीकरित्या नाव पाठवण्याचा अधिकार सरन्यायाधीशांना असतो. त्यामुळे विद्यमान सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी ही पंरपरा कायम ठेवली आहे.
न्यायमूर्ती रंजन गोगोई फेब्रुवारी 2001मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतले होते. फेब्रुवारी 2011मध्ये त्यांची पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. त्यानंतर एप्रिल 2012 पासून ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत.
गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात सरन्यायाधीशांविरोधात बंड पुकारणाऱ्या चार न्यायमूर्तींमध्ये गोगोई यांचाही समावेश होता. या घटनेनंतर त्यांचं नाव सरन्यायाधीश पदासाठी पाठवलं जाणार की नाही याबाबत चर्चा रंगली होती. लवकरच सरकारच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींकडून सरन्यायाधीशांच्या नावाची घोषणा केली जाईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
आयपीएल
Advertisement