एक्स्प्लोर
आठवलेंचं काव्यात्मक भाषण आणि संसदेत हास्याचा गडगडाट
खरंतर रामदास आठवले लोकसभा खासदार नाहीत. पण मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) प्रमुख असल्याने त्याने इथे भाषण केलं.
नवी दिल्ली : संसदेत लोकसभेचं कामकाज सुरु असून नव्या अध्यक्षांची निवडही झाली आहे. ओम बिर्ला यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येक पक्षाचा नेता सभागृहात भाषण देत आहे. काही भाषणं अशीही आहे, ज्यांनी लक्ष वेधून घेतलं. केंद्री मंत्री रामदास आठवले यांनीही आज (19 जून) सभागृहात आपल्या अंदाजात भाषण केलं. त्यांनी कविता केलीच पण असंही काहीतरी बोलले की सभागृहात एकच हशा पिकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीसह सभागृहातील प्रत्येक सदस्य पोट धरुन हसला.
आठवले यांची कविता
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना शुभेच्छा देताना रामदास आठवले यांनी नेहमीप्रमाणे सभागृहात कविता ऐकवली, जी ऐकल्यानंतर कोणालाही हसू रोखता आलं नाही.
"एक देश का नाम है रोम, लोकसभा के अध्यक्ष बन गए बिर्ला ओम
लोकसभा का आपको अच्छी तरह चलाना है काम, वेल में आने वालों का ब्लॅक लिस्ट में डालना है नाम
नरेंद्र मोदी और आपका दिल है विशाल, राहुल जी आप रहो खुशहाल
हम सब मिलकर एकता की मशाल, भारत को बनाते हैं और भी विशाल
आपका राज्य है राजस्थान, लेकिन लोकसभा की आप बन गए शान
भारत की हमें बढ़ानी है शान, लोकसभा चलाने के लिए आप हैं परफेक्ट हैं मैन'
राहुल गांधींनाही कोपरखळी
आपल्या भाषणात रामदास आठवलेंनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कोपरखळीही मारली. ते म्हणाले की, "आम्ही आता तुम्हाला सत्तेत येऊ देणार नाही. मोदी सरकार पाच वर्षांनंतर पुन्हा निवडणूक जिंकणार." यावेळी राहुल गांधी सभागृहातच उपस्थित होते आणि ते आठवलेंच्या भाषणादरम्यान हसतही होते.
जेव्हा तुमचं सरकार होतं, तेव्हा मी तुमच्यासोबत होतो, असं आठवले बोलताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला.
निवडणुकीआधी काँग्रेसवाले आमच्याकडे या असं बोलत होते. परंतु मी वाऱ्याची दिशा ओळखली होती की मोदींची हवा आहे, आठवलेंच्या या वाक्यानंतरही सगळेच हसू लागले.
खरंतर रामदास आठवले लोकसभा खासदार नाहीत. पण मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) प्रमुख असल्याने त्याने इथे भाषण केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement