एक्स्प्लोर
Advertisement
संभाजीराजे, सहस्त्रबुद्धे, दर्डा, महात्मे, राज्यसभेसाठी तिसरा कोण?
नवी दिल्ली: राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रात 11 जून रोजी निवडणूक होते आहे. काँग्रेसनं पी चिदंबरम यांना तिकीट दिलं. तर भाजपकडून तीनपैकी पीयुष गोयल यांचंच एकमेव नाव जाहीर केलं आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सत्तेचा खेळ जोरात सुरु झाला आहे. दिल्लीत चर्चा आहे ती मोदी महाराष्ट्रातून कुणाला राज्यसभेवर पाठवणार याचीच.
भाजपकडून कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती, विनय सहस्त्रबुद्धे, दत्ता मेघे आणि विकास महात्मे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं सध्या प्रत्येकच पक्षात जोरदार लॉबिंग, शह काटशहाचं अंतर्गत राजकारण पाहायला मिळतंय. ज्या सहा जागांसाठी निवडणूक होतेय, त्यापैकी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, काँग्रेसकडून पी चिदंबरम, शिवसेनेकडून संजय राऊत, भाजपकडून पीयुष गोयल यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. आता प्रश्न उरलाय तो भाजपचे आणखी दोन उमेदवार कोण असणार याचा, त्यातही रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंचं नाव महाराष्ट्रातून गृहित धरलं तर प्रश्न उरतो तो म्हणजे तिसरा कौन? एवढाच
या तिस-या जागेसाठी अगदी पहिल्यापासून चर्चा सुरु आहे ती विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नावाची. पण प्रभू, गोयल, सहस्त्रबुद्धे ही तीन नावं एकत्र उच्चारल्यावर तुम्हाला लक्षात येईल पक्षाची काय अडचण आहे ती. जातीचं, प्रदेशाचं समीकरण पाहिलं तर सहस्त्रबुद्धे यांना अजून काही काळ थांबावं लागू शकतं. शिवाय काँग्रेसनं तिकीट नाकारल्यानंतर काल विजय दर्डाही तातडीनं गडकरी वाड्यावर पोहचले. कोळसा घोटाळ्यात दर्डांचं नाव आलेलं ही गोष्ट खरी आहे. पण जिथं सीबीआय आरोपी असलेल्या हेमंत विश्व शर्मांना भाजप आसामात पायघड्या टाकू शकतं, तिथं दर्डांना अपवित्र मानायचं नाटक त्यांना करता येणार नाही.
शिवाय मोदींचं गुणगान गाऊन दर्डांनी आपली दिशा आधीच दाखवून दिलेली आहे. राज्यसभेसाठी तिसरी शक्यता आहे ती प्रादेशिक संतुलन राखण्यासाठी मराठवाडा, किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या एखाद्या नावाची. पण सध्या तरी असा कुणी ठळक चेहरा भाजपकडे नाही. यावेळीही पुन्हा अमर साबळे यांच्यासारखं एखादं सरप्राईज पॅकेज पक्ष दिल्लीत पाठवणार का याचीही उत्सुकता आहे.
या व्यतिरिक्त नागपूरचे डॉक्टर विकास महात्मे यांचीही सरप्राईज एण्ट्री होऊ शकते. कारण डॉ. महात्मे हे गेली 2-3 वर्ष धनगर आरक्षणाच्या मुद्द्यासाठी लढत आहेत. त्यांना उमेदवारी देऊन भाजप धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर असलेली धनगर समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करु शकेल.
काँग्रेसचं संख्याबळ
संख्याबळानुसार काँग्रेसला एकच उमेदवार राज्यसभेवर पाठवता येणार आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्यासह राज्यातल्या अनेक दिग्गजांचा पत्ता कट करत हायकमांडनं मात्र चिदंबरम यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केलं. चिदंबरम यांच्या नावालाही वादाची झालर आहे तरीही.
सगळ्याच पक्षांचा प्रयत्न आहे राज्यसभेची ही निवडणूक बिनविरोध करण्याचा. त्यामुळे सहा जागांसाठी सहाच उमेदवार रिंगणात येतील अशी शक्यता आहे. मोदी- शहांची जोडगोळी यावेळी महाराष्ट्रातून कुणाला संधी देणार, आणि पक्षातलं जातीय संतुलन राखण्यासाठी नेमकी काय गणितं आखणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement