एक्स्प्लोर
राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी 9 ऑगस्टला निवडणूक
सरकार आणि विरोधकांकडेही संपूर्ण बहुमत नसल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. विरोधकांकडून अजून कोणत्याही नावावर सहमती झालेली नाही. तर एनडीएने जेडीयूचे खासदार हरिवंश यांना उमेदवारी दिली आहे.
![राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी 9 ऑगस्टला निवडणूक Rajyasabha deputy chairman election, to held on 9th August राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी 9 ऑगस्टला निवडणूक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/19082248/Parliament.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे. उपसभापतीपदाची निवडणूक गुरुवारी म्हणजे नऊ ऑगस्टला होईल, अशी माहिती सभापती व्यंकय्या नायडू यांनी दिली. सरकार आणि विरोधकांकडेही संपूर्ण बहुमत नसल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार आहे.
विरोधकांकडून अजून कोणत्याही नावावर सहमती झालेली नाही. तर एनडीएने जेडीयूचे खासदार हरिवंश यांना उमेदवारी दिली आहे. विरोधकांकडून तृणमूल काँग्रेसचा उमेदवार दिला जाणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र टीएमसीने यासाठी नकार दिला. त्यानंतर आता कुणाला संधी दिली जाते, त्याकडे लक्ष लागलं आहे.
राज्यसभेत कोणत्या पक्षाकडे किती जागा?
एनडीए
भाजप 73
जेडीयू 6
शिवसेना 3
अकाली दल 3
एआयएडीएमके 13
आरपीआय 1
सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट 1
तेलंगणा राष्ट्र समिती 6
नागा पिपल्स फ्रंट 1
अपक्ष 4
नामनिर्देशित 3
एकूण 115
यूपीए
काँग्रेस 50
समाजवादी पक्ष 13
राष्ट्रवादी काँग्रेस 4
डीएमके 4
आरजेडी 5
इंडियन युनियन मुस्लीम लीग 1
केरळ काँग्रेस (एम)
झारखंड मुक्ती मोर्चा 0
सीपीआयएम 5
बसपा 4
सीपीआय 2
तेलुगू देसम पार्टी 6
जेडीएस 1
तृणमूल काँग्रेस 13
आम आदमी पक्ष 3
नामनिर्देशित 1
एकूण 113
इतर
बिजू जनता दल 9
वायएसआर काँग्रेस 2
इंडियन नॅशनल लोक दल 1
पीडीपी 2
अपक्ष 2
एकूण 16
रिक्त 1
एकूण 245
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)