(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक, 'या' बड्या नेत्यांचा कार्यकाळ समाप्त
10 जून रोजी राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये भाजपचे सर्वाधिक 25 खासदार निवृत्त होत आहेत.
Rajya Sabha Retiring Members : देशातल्या 15 राज्यातील 57 जागांवर राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. या सर्व 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होत आहे. 57 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 21 जून ते 1 ऑगस्ट यादरम्यान संपत आहे. राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तयारी सुरु केली आहे. यासाठी अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. ज्या महत्त्वाच्या नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यामध्ये काही दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे.
कार्यकाल संपत असलेल्या नेत्यांमध्ये केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा समावेश आहे. याशिवाय काँग्रेस नेते जयराम रमेश, कपिल सिब्बल यांचा कार्यकाळही संपत आहे. त्याचबरोबर बसपचे सतीश चंद्र मिश्रा यांचा कार्यकाळही संपत आहे. पंजाबमधील एकमेव अकाली दलाचे राज्यसभा सदस्य बलविंदर सिंग भूंदर आणि काँग्रेसच्या अंबिका सोनी यांचाही कार्यकाळ संपणार आहे.
राज्यसभेच्या 57 खासदारांचा कार्यकाळ संपत आहे
उत्तर प्रदेशातील 11 राज्यसभा खासदार जुलैमध्ये निवृत्त होत आहेत. या खासदारांमध्ये भाजपचे 5, समाजवादी पक्षाचे 3, बसपाचे 2 आणि काँग्रेसचा 1 सदस्य आहे. तसेच बिहारमधून 5 राज्यसभा सदस्य जुलै महिन्यात निवृत्त होणार आहेत. ज्यामध्ये आरजेडीच्या मीसा भारती, भाजप नेते सतीश चंद दुबे आणि गोपाल नारायण सिंह यांचा समावेश आहे. तर जेडीयूचे रामचंद्र मिश्र यांचा समावेश आहे. याशिवाय दुसरी जागा शरद यादव यांच्याकडे होती.
भाजपच्या 'या' नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे
मुख्तार अब्बास नकवी
पीयूष गोयल
निर्मला सीतारमण
सुरेश प्रभु
रामविचार नेताम
एम जे अकबर
ओमप्रकाश माथुर
शिव प्रताप शुक्ला
जफर इस्लाम
काँग्रेसच्या 'या' नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे
पी चिदंबरम
जयराम रमेश
अंबिका सोनी
छाया वर्मा
प्रदीप टमटा
कार्यकाळ संपत असलेले अन्य काही नेते
प्रफुल्ल पटेल (NCP)
मीसा भारती (RJD)
बलविंदर सिंह भूंदड़ (अकाली दल)
सतीश चंद्र मिश्र (BSP)
राम चंद्र मिश्रा (JDU)
सस्मित पात्रा (BJD)
प्रसन्ना आचार्य (BJD)
टीकेएस एलंगोवन (DMK)