एक्स्प्लोर

उपसभापती निवडणूक: नितीशकुमारांचे सर्वपक्षीय नेत्यांना फोन

राज्यसभेचे सध्या 245 खासदार आहेत. विजयासाठी 123 मतांची गरज आहे. दोन्ही बाजूंचे पक्के मित्रपक्ष पकडले तर यूपीए 115 आणि एनडीए 115 इतकी काट्याची टक्कर आहे.

नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी आज (गुरुवारी) निवडणूक होणार आहे. एनडीएचे उमेदवार हरिवंश नारायण आणि यूपीएचे उमेदवार राज्यसभा खासदार बीके हरीप्रसाद यांच्यात ही लढत होणार आहे. काँग्रेसचे पी. जे. कुरियन 1 जुलै रोजी निवृत्त झाल्याने राज्यसभेतील उपसभापतीपद रिक्त आहे. या पदासाठी आज (गुरुवारी) निवडणूक होणार आहे. राज्यसभेचे सध्या 245 खासदार आहेत. विजयासाठी 123 मतांची गरज आहे. यूपीए आणि एनडीए यांच्या खासदारांची आकडेवारी पाहिली तर यूपीएचे 113 आणि एनडीएचे 115 खासदार आहेत. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशकुमार यांनी हरिवंश यांच्या विजयासाठी सर्वपक्षीय नेत्यांना फोन करुन पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. नितीशकुमार यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना फोन केले आहेत. नीतीश कुमार यांच्या फोनचा परिणाम? नितीशकुमार यांनी केलेल्या फोनचा सकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. ओडिशातील बीजेडीने तर महाराष्ट्रातील शिवसेनेने हरिवंश नारायण यांना समर्थन जाहीर केले आहे. तर जम्मू-काश्मीरच्या पीडिपीने मतदानात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांनीसुद्धा हरिवंशयांच्या बाजूने मतदानाची आशा व्यक्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष या मतदानात भाग घेणार नसल्याचे समजते. शरद पवारांनी का घेतली माघार? मंगळवारपर्यंत उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचं नाव चर्चेत होतं. मात्र शरद पवारांनी बीजेडीचे नवीन पटनायक यांना फोन केला, तेव्हा नवीनबाबूंनी नितीशकुमारांनी आधीच समर्थन मागितल्याने, आपण त्यांना शब्द दिल्याचं सांगितलं. नवीन पटनायकांची ही भूमिका काँग्रेसला कळवून पवारांनी ते साथ देत नसतील तर आपला उमेदवार देण्यात रस नाही अशी भूमिका घेतली. काय आहे गणित? राज्यसभेचे सध्या 245 खासदार आहेत. विजयासाठी 123 मतांची गरज आहे. दोन्ही बाजूंचे पक्के मित्रपक्ष पकडले तर यूपीए 113 आणि एनडीए 115 इतकी काट्याची टक्कर आहे. 9 खासदार असलेल्या बीजेडीचं मतदान ज्याच्या पारड्यात, तो विजेता अशी स्थिती होती. पण ओडिशात भाजप हा बीजेडीचा प्रमुख शत्रु असतानाही, उमेदवार नितीशकुमारांचा आहे असं सांगत बीजेडी एनडीएच्या गोटात शिरली आहे. 2019 च्या आघाड्यांचं प्रतिबिंब राज्यसभेच्या या निवडणुकीत पुढच्या लोकसभा निवडणुकीत आघाड्यांची जोडतोड कशी होऊ शकते याचं छोटं प्रतिबिंब पाहायला मिळालं. टीआरएस, एआयडीएमके, बीजेडी हे सगळे पक्ष भाजपप्रणित एनडीएच्या बाजूला उभे राहिले. तर शिवसेनाही निमूटपणे एनडीएलाच मतदान करणार आहे. त्यामुळे राज्यसभेत अगदी हातातोंडाशी आलेला विजय विरोधकांच्या हातातून निसटला आहे. सर्वाधिक 73 (नामनिर्देशित 8 पकडून) खासदार भाजपकडे असले तरी पूर्ण बहुमत नसल्याने भाजपने स्वत:चा उमेदवार दिला नाही. मित्रपक्षांना संधी दिल्याशिवाय भाजपलाही एनडीए मजबूत करता आली नसती. संबंधित बातम्या
राज्यसभेच्या उपसभापती निवडणुकीत विरोधी एकजुटीची हवा निघाली?
राज्यसभा : यूपीएमध्ये एकजूटता नाही, राष्ट्रवादीचा लढण्यास नकार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget