एक्स्प्लोर
पावसाचा चुकीचा अंदाज, राजू शेट्टींची सडकून टीका
हवामान खात्याच्या फसलेल्या अंदाजावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सडकून टीका केली.
नवी दिल्ली: हवामान खात्याच्या फसलेल्या अंदाजावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सडकून टीका केली.
यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असं हवामान विभागाने सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे. कुठे आहे मग सरासरीपेक्षा जास्त पाऊस?, असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला. ते एबीपी माझाशी बोलत होते.
त्यांचा खेळ होतो, शेतकऱ्यांच्या मात्र जीव जातो. चंद्रावर काय आहे, मंगळावर काय होतंय हे तंत्रज्ञान आलंय. मात्र आज इथं पाऊस किती पडणार हे कळेना. मग हे जमणार नसेल तर त्याऐवजी भविष्य सांगणाऱ्यांकडूच अंदाज सांगावा, हवामान खात्याने अंदाज बंद करावेत, असं टीकास्त्र राजू शेट्टी यांनी सोडलं.
इतक्या महत्त्वाच्या खात्याबाबत सरकार किती गंभीर आहे हे कळतं. पंतप्रधान इतके दौरे करतात विदेशात, त्यातला एखादा रद्द केला तर तेवढ्या पैशात हवामान खात्याचा एखादं सॅटेलाईट सोडता येईल, असा टोमणा राजू शेट्टी यांनी लगावला.
पाश्चात्त्य देशांमध्ये गारपीट, वादळाचे अगदी मिनिटा मिनिटाचे अंदाज दिले जातात, मग आम्ही काय करतोय? असा सवाल राजू शेट्टींनी विचारला.
या हवामान खात्याचा फटका खुद्द मुख्यमंत्र्यांनाही बसलाय. त्यांच्याच अंदाजावर भरवसा ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पेरणीची गडबड करु नका असा सल्ला दिला होता. हवामान खात्याचा फटका राज्याच्या प्रमुखालाच बसलाय. यांच्या तावडीतून कुणी सुटलेलं नाही, असं राजू शेट्टी म्हणाले.
हवामान खात्यावर भरवसा ठेवून शेतकऱ्यांना नियोजन केलं तर त्याच्या नेमकं उलटं होतंय. एकवेळ एखाद्या कसलेल्या राजकारण्याच्या स्वभावाचा अंदाज लावता येईल, पण हवामान खात्याचा नाही, असाही टोला राजू शेट्टी यांनी लगावला.
परभणीत तक्रार
खते, बी बियाणे आणि औषधी कंपन्यांना फायदा पोहोचवून देण्यासाठी, पॅकेज घेऊन हवामान खात्याने राज्यासह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे. यावरच न थांबता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विभागीय अध्यक्ष माणिक कदम यांनी हवामान खात्याच्या संचालकांविरोधात 420 चा गुन्हा दाखल करण्यासाठी परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दिला आहे.
संबंधित बातम्या
“हवामान खात्याविरोधात ‘420’चा गुन्हा दाखल करा”
यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस, IMD ची गुड न्यूज!
नवी दिल्ली : यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस, हवामान विभागाचा दुसरा अंदाज यंदा सरासरी इतका पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज यंदा चांगला पाऊस पडणार, स्कायमेटची गुड न्यूज! राजा गादीवर कायम, पाऊस सर्वसाधारण, भेंडवळची भविष्यवाणीअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement