एक्स्प्लोर

Rajinikanth in Politics | तमिळनाडूमध्ये 'रजनी'कारण? अभिनेते रजनीकांत आज मोठी राजकीय घोषणा करण्याची शक्यता

Rajinikanth in Politics : तमिळनाडूमध्ये 'रजनी'कारण सुरु होण्याची शक्यता आहे. आज रजनीकांत आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे थलैवा राजकारणात एन्ट्री करणार का? याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे.

Rajinikanth in Politics : तमिळनाडू (Tamil Nadu) मधील गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर तेथील राजकीय पक्ष निवडणुकांच्या दृष्टीने सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, सर्वांच्या मनात एक प्रश्न नक्कीच आहे की, पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये थलैवा म्हणजेच, रजनिकांत निवडणूक लढवणार का? यासंदर्भात आज म्हणजेच, 30 नोव्हेंबर रोजी अभिनेता रजनीकांत (Rajinikanth) तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2021 साठी आपल्या राजकीय इनिंगबाबत मोठी घोषणा करू शकतात.

निवडणूक लढण्याचे दिले संकेत

तमिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा (Tamil Nadu Assembly Election) निवडणूकीपूर्वी दाक्षिणात्य चित्रपटांतील सुपरस्टार रजनीकांत यांचं राजकारणातील एन्ट्रीबाबत वक्तव्य समोर आलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून संकेत मिळाले आहेत की, रजनीकांत विधानसभा निवडणूक लढू शकतात. तमिळनाडूतील सर्व राजकीय पक्षांची नजर आज होणाऱ्या रजनीकांत यांच्या संघटनेच्या बैठकीवर आहे. कारण या बैठकीनंतरच रजनीकांत पुढल्या वर्षी होणारी तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2021 लढवणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

आज मिळू शकतं रजनीकांत यांच्या राजकीय इनिंगचं उत्तर

2021मध्ये तमिळनाडू विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. या निवडणूकांमध्ये रजनीकांत आणि त्यांच्या संघटनेची नेमकी भूमिका काय असणार? याबाबत अद्याप कोणतीच स्पष्टता मिळालेली नाही. आज होणाऱ्या बैठकीनंतर या रहस्यावरून पडदा उठणार आहे, रजनीकांत यांनी आपल्या वक्तव्यामध्ये म्हटलं आहे की, सर्वात आधी ते रजनी मक्कल मंडरमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील, त्यानंतरच विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, यासंदर्भात निर्णय घेण्यात येतील.

गेल्या दोन वर्षांपासून सक्रिय आहेत रजनीकांत

रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. परंतु, अधिकृतरित्या अद्याप त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला नाही. दरम्यान, गेल्या वर्षी अभिनेता कमल हसन आणि रजनीकांत यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर हे दोघेही एकत्र येऊन राजकारणाची इनिंग खेळणार असल्याच्या चर्चांनी तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ माजली होती.

सोशल मीडियावरही #RajinikanthPoliticalEntry हॅशटॅग ट्रेंड

रजनीकांत यांच्या राजकीय एन्ट्रीबाबत चर्चा रंगल्यानंतर ट्विटरवर #RajinikanthPoliticalEntry हा हॅशटॅग ट्रेंड करतो आहे. यापूर्वी रजनीकांत यांनी 2017 साली डिसेंबरमध्ये घोषणा केली होती की, तमीळनाडूमध्ये राजकीय पक्षाची स्थापना करणार. पण त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूकीत सहभाग घेतला नव्हता. मात्र यावेळी ते राजकारणात निश्चित प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

'बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget