Gujarat Assembly Election : 500 रुपयांत गॅस, 10 लाख नोकऱ्या अन् शेतकऱ्यांची कर्जमाफी; काँग्रेसकडून गुजरातसाठी जाहिरनामा
Gujarat Assembly Election 2022 : राहुल गांधी यांनी ट्विट करत गुजरातमधील जनतेला आठ आश्वासनं दिली आहेत, यामध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतीपासून नोकरीपर्यंतचा समावेश आहे.
![Gujarat Assembly Election : 500 रुपयांत गॅस, 10 लाख नोकऱ्या अन् शेतकऱ्यांची कर्जमाफी; काँग्रेसकडून गुजरातसाठी जाहिरनामा rahul gandhicongress manifesto gujarat assembly election gas cylinder jobs and farmers loan waiver Gujarat Assembly Election : 500 रुपयांत गॅस, 10 लाख नोकऱ्या अन् शेतकऱ्यांची कर्जमाफी; काँग्रेसकडून गुजरातसाठी जाहिरनामा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/05/80e63f508f26d62c59454931ca470e041667666187269235_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gujarat Assembly Election 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकींचं बिगुल वाजलं आहे. दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेसकडून नुकतीच उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुजरातसाठी जाहिरनामा सांगितला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत गुजरातमधील जनतेला आठ आश्वासनं दिली आहेत, यामध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतीपासून नोकरीपर्यंतचा समावेश आहे.
राहुल गांधी यांचं ट्वीट -
राहुल गांधी यांनी ट्विट करत जाहिरनामा सांगातानाच सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, 'भाजपच्या डबल इंजिनच्या धोक्यापासून वाचवू, राज्यातील परिवर्तनचा उत्सव करुयात..' 500 रुपयांमध्ये सिलेंडर, 10 लाख नोकऱ्या आणि शेतकऱ्यांचं तीन लाखांपर्यंतच कर्ज माफ करुयात, असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं आहे. त्यासोबत राहुल यांनी गुजराती लोकांना 8 वचन दिले आहेत. पाहूयात काय म्हटलेय नेमकं त्यांनी.
₹500 में LPG सिलेंडर,
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 6, 2022
युवाओं को 10 लाख नौकरियां,
किसानों का 3 लाख तक क़र्ज़ा माफ़ -
हम, गुजरात के लोगों से किए सारे #CongressNa8Vachan निभाएंगे।
भाजपा के ‘डबल इंजन’ के धोखे से बचाएंगे, प्रदेश में परिवर्तन का उत्सव मनाएंगे। pic.twitter.com/v1GtVP183L
काँग्रेसचा गुजरात निवडणुकीचा जाहिरनामा -
गॅस सिलेंडर 500 रुपयांत दिला जाईल. त्याशिवाय घरगुती वीज 300 युनिटपर्यंत मोफत.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना लागू केली जाईल.
केजी ते पीजी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण दिलं जाईल. राज्यात तीन हजार नवीन इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु केल्या जातील.
10 लाख नोकऱ्या दिल्या जातील. 3000 रुपयांपर्यंत बेरोजगारी भत्ता दिला जाईल.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबाला चार लाख रुपयांची मदत
आधुनिक सुविधा असलेली रुग्णालय तयार करण्यात येतील. 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळेल.
शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाईल. त्याशिवाय वीज बिलही माफ केलं जाईल.
ड्रग्स माफियाविरोधात ठोस कारवाई करण्यात येईल.
इंदिरा रसोई योजनाअंतर्गत गरजूंना 8 रुपयांत जेवण
कधी आहे गुजरातची निवडणूक?
निवडणूक आयोगानं दोन टप्प्यात गुजरातची निवडणूक होईल, अशी घोषणा केली आहे. एक डिसेंबर आणि पाच डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 182 जागांवरील निकाल 8 डिसेंबर रोजी येणार आहेत. भाजप, काँग्रेस आणि आप पक्षामध्ये येथे टक्कर होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)