एक्स्प्लोर

संसदीय समितीच्या बैठकीत विना अडथळा बोलू द्यावं, राहुल गांधींचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

संसदीय समितीच्या बैठकीत आपल्याला बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करत आपल्याला विना अडथळा बोलण्याची संधी मिळावी अशा मागणीचं पत्र राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहलं आहे. बुधवारी झालेल्या संसदीय समितीच्या बैठकीत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास परवानगी नाकारल्यानं त्याचा निषेध करत राहुल गांधींनी वॉकआउट केलं.

नवी दिल्ली: कॉंग्रेस नेता राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना एक पत्र लिहून आपल्याला संसदीय समितीच्या बैठकीत बोलू दिलं जात नसल्याचा आरोप केलाय. संसदेत निवडून आलेल्या खासदारांना संसदीय समितीच्या बैठकीत विना अडखळा आपलं मत मांडण्याची संधी मिळावी अशी मागणीही त्या पत्रात करण्यात आली आहे.

काय आहे वाद? बुधवारी संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा न होता केवळ लष्कराच्या गणवेशाच्या रंगावर चर्चा केली जाते असा आरोप करत त्या बैठकीतून राहुल गांधी आणि इतर कॉंग्रेसचे नेते बाहेर पडले. मुख्य मुद्द्यावर चर्चा न करता अवांतर विषयावर चर्चा करुन वेळ वाया घालवला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.

सूत्रांच्या मते, राहुल गांधी यांनी संसदीय समितीच्या बैठकीत लडाखमधील चीनचे आक्रमण आणि भारतीय लष्कराला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे उपलब्ध करुन द्यावे हे मुद्दे उपस्थित करु द्यावेत अशी मागणी केली. परंतु समितीचे अध्यक्ष असलेले भाजपचे जुएल उरांव यांनी राहुल गांधींना याची परवानगी दिली नाही.

लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्या उपस्थितीत ही चर्चा झाली. त्यामध्ये तिन्ही दलांच्या कर्मचाऱ्यांच्या गणवेशाच्या रंगावर चर्चा करण्यात येत होती. राहुल गांधींनी याला आक्षेप घेत देशासमोर प्रमुख समस्या असलेले चीनचं आक्रमण आणि भारतीय लष्कराला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची उपलब्धता या विषयावर चर्चा करावी अशी मागणी केली. त्यावेळी समितीच्या अध्यक्षांनी राहुल गांधींच्या या मागणीला परवानगी नाकारली.

भाजपचं प्रत्युत्तर राहुल गांधींनी या मुद्द्यावरुन आता भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, "घटनात्मक संस्थाविषयी राहुल गांधी यांना किती आदर आहे हे कालच्या बैठकीतून दिसून आलंय. संरक्षण खात्याशी संबंधित समितीच्या बैठकीतून ते बाहेर पडले. हा घटनात्मक संस्थांचा अपमान आहे. त्यांनी या संस्थांचा आदर करावा नाहीतर लोकशाहीत त्यांची भूमिका अजून नगण्य होत जाईल."

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
Embed widget