एक्स्प्लोर
अधिवेशनापूर्वी संसदेबाहेर राहुल गांधी नरेंद्र मोदींना भेटणार
नवी दिल्ली : दिल्लीतील संसदीय हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी संसदेच्या बाहेरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट होणार आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास दोघांची चर्चा होण्याची शक्यता आहे.
विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या गोंधळामुळे अधिवेशनात कोणतंही कामकाज झालं नाही. जीएसटी, सरोगसी यांसारखी अनेक महत्त्वाची विधेयकं प्रलंबित असूनही यावर कोणतीही चर्चा झाली नाही. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी संसदेबाहेरच मोदी आणि राहुल गांधी यांची शेतकऱ्यांचा कर्जमाफीवर चर्चा होणार आहे.
यावेळी राहुल गांधींसोबत काँग्रेसचे इतरही कार्यकर्ते सोबत असतील. अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने दोघांमध्ये काय चर्चा रंगणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फुगा फोडणारी स्फोटक माहिती माझ्याकडे आहे, त्यामुळे मला संसदेत बोलू दिलं जात नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवरच थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले.
दरम्यान, देशात उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी तृणमूल काँग्रेस, सप, द्रमुक यासारखे विरोधीपक्ष आज राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. यंदाचं हिवाळी अधिवेशन नोटाबंदीच्या मुद्द्यावरुन गाजलं. या काळात कोणत्याही विधेयकावर पूर्णपणे चर्चा झाली नाही. मात्र आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने विरोधीपक्षनेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. या बैठकीत प्रामुख्याने नोटाबंदीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
मोदींचा फुगा स्फोटक माहितीने फोडणार : राहुल गांधी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement