Rahul Gandhi on Mamata Banerjee : खेला होबे बाकी! ममता बॅनर्जींचा स्वबळाचा नारा पण राहुल गांधींच्या वक्तव्याने भूवया उंचावल्या
Rahul Gandhi on Mamata Banerjee : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ममता यांच्यावरून केलेल्या वक्तव्याने भूवया उंचावल्या आहेत. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे.
Rahul Gandhi on Mamata Banerjee : लोकसभा निवडणुकीला (Loksabha Election 2024) आता काही महिने उरले आहेत. एनडीएचा सामना करण्यासाठी इंडिया आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, तर पंजाबमध्येही आम आदमी स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. ममता बॅनर्जी यांनी स्वबळाचा नारा दिल्याने बंगालमध्ये काँग्रेसला धक्का बसला आहे. जागावाटपावरून नाराज झाल्याने ममतांनी स्वबळाचा नारा दिला. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ममता यांच्यावरून केलेल्या वक्तव्याने भूवया उंचावल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेसह पश्चिम बंगालमध्ये पोहोचले आहेत. राहुल यांनी डिजिटल मीडियातील तरुणांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तरुणांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमात एका युवकाने त्यांना प्रश्न केला की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षासोबत इंडिया आघाडीची युती आहे. मात्र, आता पक्षाचा दृष्टिकोन बदलला असून पक्ष वेगळे होताना दिसत आहे. शेवटी ममता यांना एवढे प्राधान्य का दिले जात आहे?
मैं मुश्किल सवालों से नहीं डरता, फिर वो INDIA गठबंधन पर हो, कांग्रेस छोड़ गए नेताओं पर हो या #PaanchNYAY पर।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 2, 2024
पश्चिम बंगाल में डिजिटल मीडिया योद्धाओं के साथ एक लंबी और सार्थक चर्चा हुई।
ईमानदारी से खुलकर सवालों का जवाब देना अच्छा लगता है, सत्ता में बैठे लोग भी कोशिश कर सकते हैं। pic.twitter.com/ZFxHvPDP1q
याला उत्तर देताना राहुल म्हणतात, आमची इंडिया आघाडी आहे. ममता बॅनर्जी किंवा आम्ही इंडियाशी युती तोडलेली नाही. ममताजी सुद्धा आघाडीत असल्याचे सांगत आहेत. आम्हीही युतीत आहोत असे म्हणत आहे. जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे. यावर लवकरच तोडगा निघेल. राहुल यांच्या या विधानावरून काँग्रेस-तृणमूल काँग्रेसमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
ममता काय म्हणाल्या होत्या?
ममता बॅनर्जी यांनी गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. तथापि, राष्ट्रीय स्तरावर त्यांचा पक्ष टीएमसी इंडिया आघाडीचा भाग राहील. डावे पक्ष इंडिया आघाडीचा अजेंडा हायजॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ममता यांनी केला. ज्या डाव्या पक्षांना बाजूला करून सत्तेवर आल्या, त्यांच्याशी युती करून निवडणूक लढवणे अवघड आहे. काँग्रेसच्या जागावाटपातील दिरंगाईमुळेही त्या नाराज होत्या.
ममता म्हणाल्या, 'मी काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये जागावाटपाचा प्रस्ताव दिला होता. मात्र त्यांनी सुरुवातीला नकार दिला. आता बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार आहोत. राज्यात काँग्रेससोबत कोणताही संबंध ठेवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या