UP Election 2022 : सत्ता मिळवण्यासाठी ते काहीही करू शकतात, राहुल गांधींचा भाजपवर निशाणा
"हिंदू आयुष्यभर सत्याच्या वाटेने चालतात. सत्य शोधणे आणि त्याच्यासाठी लढण्यात हिंदू आपले आयुष्य वाहून देतात. भीतीचा सामना करतात. भीतीला राग आणि हिंसेत बदलू देत नाहीत." असे राहुल गांधी म्हणाले.
Rahul Gandhi Amethi Visit : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीवरून (UP Election 2022) वातावरण तापत आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतानाच आज काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. "हिंदू पूर्ण आयुष्यभर सत्याच्या वाटेने चालतात. सत्य शोधणे आणि त्याच्यासाठी लढण्यात हिंदू आपले आयुष्य वाहून देतात. भीतीचा सामना करतात. भीतीला राग आणि हिंसेत बदलू देत नाहीत. परंतु, हिंदुत्ववाद्यांचे काम खोट्याच्या आधारावर सत्ता मिळविण्याचे असते. हे द्वेष पसरवतात आणि सत्ता मिळवण्यासाठी काही पण करू शकतात." अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी सध्या अमेठीच्या दौऱ्यावर आहेत. तेथे घेतलेल्या सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, "काही दिवसांपूर्वीच प्रियांका (Priyanka Gandhi) लखनऊला चला असे म्हणाल्या होत्या. परंतु, मी सांगितले, पहिल्यांदा घरी जातो. प्रथम घरातील सदस्यांसोबत चर्चा करू इच्छितो. पहिल्यांदा 2004 मध्ये येथून पहिली निवडणूक लढवली आणि खूप काही शिकलो. तुम्ही रस्ता दाखवला. माझ्यासोबत चालला. त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो"
"काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगेत स्नान केले. परंतु, ते हे सांगत नाहित की, रोजगार का कमी झाले आहेत? एवढ्या वेगाने महागाई का वाढत आहे?, रोजगार देणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांवर मोदींनी आक्रमन केले. नोटबंदी, जीएसटी आणि कोरोनावेळी कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. त्यामुळे छोटे व्यापार बंद पाडले. त्यांचा व्यापार जवळच्या दोन-तीन पैसेवाल्या मित्रांना दिले." अशी टीका राहूल गांधी यांनी केली.
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, "शेतकऱ्यांचा फायदा सांगून तीन काळे कायदे आणले. देशभरातील शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर वर्षभराने पंतप्रधानांनी माफी मागीतली. म्हणाले, चूक झाली. संसदेत सरकारने सांगितले की, आंदोलनादरम्यान किती शेतकऱ्यांचा मृत्यू झाला हे माहिती नाही."
छोट्या दुकानदारांना नोटबंदी, जीएसटीचा फायदा मिळाला का? असा प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले, "नोटबंदी, जीएसटी आणि कृषी कायद्यांचे 'हम दो महारे दो' एवढाच उद्देश आहे. नरेंद्र मोदी त्यांच्यासाठी काम करतात आणि ते मोदींचे मार्केटींग करतात. अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली.
राहुल गांधी म्हणाले, "माझे भाषण 30 सेकंद चालेल, परंतु, मोदींचे भाषण 6 महिने चालेल. कधी गंगा स्नान करतील, कधी हायवेवर जहाज उतरवतील, आपले लक्ष भरकटवणे हाच यातून उद्देश आहे. आज लडाखमध्ये चीनचे सैन्य देशात घुसून बसले आहे. हजार इंच जमीनीवर ताबा मिळवला आहे. परंतु, त्यावर पंतप्रधान काहीच बोलले नाहीत. विचारले तर म्हणाले कोणीच जमीन नाही घेतली. नंतर संरक्षण मंत्रालय सांगते चीनने आमची जमीन घेतली आहे."
महत्वाच्या बातम्या
- मुलांना कोरोना लस मिळण्याचा मार्ग मोकळा, सीरमच्या Covovax लसीच्या आपत्कालीन वापराला WHO ची मान्यता
- गावातील लसीकरण कमी झाल्यास सरपंचांची डोकेदुखी वाढणार, परभणीत 37 गावांना नोटीसा
- नाताळ, नवीन वर्षाच्या मोठ्या सेलिब्रेशनवर ओमायक्रॉनचे सावट; कठोर निर्बंध लागू होणार?