एक्स्प्लोर
राहुल गांधींच्या रोड शोमध्ये आगीचा भडका, सर्वजण सुखरुप
आरतीचं ताट गॅसच्या फुग्यांच्या संपर्कात आल्यामुळे लहानसा स्फोट होऊन आगीच्या ज्वाळा उठल्या.
जबलपूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जबलपूरमधील रोड शो दरम्यान गॅसच्या फुग्यांमुळे आगीचा भडका उडाला. सुदैवाने आग न भडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. राहुल गांधींसह सर्व जण सुखरुप आहेत.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी आरतीची तयारी केली होती. शास्त्री ब्रिज परिसरात गॅसने भरलेले फुगेही होते. आरतीचं ताट गॅसच्या फुग्यांच्या संपर्कात आल्यामुळे लहानसा स्फोट होऊन आगीच्या ज्वाळा उठल्या.
राहुल गांधी यांच्या बसपासून काही फूट अंतरावरच ही घटना घडली. त्यामुळे राहुल गांधींसह गाडीतील सर्वच नेते घाबरले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ जमावाला दूर लोटलं.
मध्य प्रदेशसह राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरममध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. 28 नोव्हेंबरला मध्य प्रदेश आणि मिझोरममध्ये विधानसभेसाठी मतदान होईल. पाचही राज्यातील निवडणुकांचा निकाल 11 डिसेंबरला हाती येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement