एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काँग्रेस अध्यक्षपदावर राहणार नाही, राहुल गांधींचा पुनरुच्चार, काँग्रेस खासदारांच्या बैठकीत निर्णय
राहुल गांधी काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर अजूनही ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नवी दिल्ली : राहुल गांधी काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर अजूनही ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे काँग्रेसच्या संसदीय समितीची बैठक सुरु आहे. या बैठकीत राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदावर राहणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली आहे.
राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम असल्यामुळे काँग्रेसच्या खासदारांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षपदी कायम राहावे, कारण राहुल गांधी यांना पर्याय नसल्याचे मत खासदारांनी मांडले. खासदारांचे म्हणणे राहुल गांधी यांनी ऐकून घेतले, परंतु पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा हाच आपला निर्णय अंतिम असल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, युवक काँग्रेसच्या सदस्यांनी राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी करत राजीनामा मागे घेण्याचा आग्रह केला. परंतु राहुल यांनी राजीनामा मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार? आणि कधीपर्यंत नव्या अध्यक्षांची निवड जाहीर होणार? यावर सर्वत्र चर्चा सुरु आहे.
राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीकडे पक्षाध्यक्षपदाच्या राजीनामा सोपवल्यापासून 32 दिवस उलटले आहेत. परंतु नवा काँग्रेस अध्यक्ष कोण असणार? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. काही हिंदी वृत्तपत्रांनी अशोक गहलोत हे पुढील काँग्रेस अध्यक्ष होतील, अशी बातमी प्रसिद्ध केली. परंतु तूर्तास तरी पक्षात अशी कुठलीही हालचाल नसल्याचे राहुल गांधींनी स्पष्ट केले आहे. तसेच नव्या काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीत माझी कोणतीही भूमिका नसेल, हेदेखील राहुल यांनी स्पष्ट केले आहे.Sources: In the Congress Parliamentary party meeting chaired by Sonia Gandhi, Rahul Gandhi was determined not to take back his resignation as the Congress President. (Visuals after the conclusion of the meeting) pic.twitter.com/ia7o9AoxnU
— ANI (@ANI) June 26, 2019
अशोक गहलोत, ए.के.अँटोनी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काही इतर नव्या तरुण चेहऱ्यांची नावेदेखील काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. परंतु प्रत्येक नावाला काही मर्यादा असल्याने या निर्णयापर्यंत पक्ष पोहचलेला नाही. त्याचबरोबर 'गांधीच हवेत, तेच पक्षाचे तारणहार' हा जुना आलापही काही नेते गिरवत आहेत.Delhi: Members of Youth Congress and workers of the party demonstrate outside the residence of Congress President Rahul Gandhi urging him to take back his resignation and continue as the party President. pic.twitter.com/KIMvCKuS11
— ANI (@ANI) June 26, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
भारत
राजकारण
Advertisement