एक्स्प्लोर
राहुल गांधींकडून मराठीत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आषाढी एकादशीनिमित्त मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत. एका अभंगासह राहुल गांधींनी फेसबुकवरुन या शुभेच्छा दिल्या.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या यादीत दहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांना जवळपास 52 लाख 20 हजारांपेक्षा जास्त जण फॉलो करतात.
मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आषाढी एकादशीनिमित्त मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत. एका अभंगासह राहुल गांधींनी फेसबुकवरुन या शुभेच्छा दिल्या. ‘अवघा रंग एक झाला। रंगि रंगला श्रीरंग॥ मी तूंपण गेले वायां। पाहतां पंढरीच्या राया॥’ या अभंगासह राहुल गांधींनी श्री विठ्ठलाचा फोटो शेअर करत मराठीत शुभेच्छा दिल्या. अलिकडे राष्ट्रीय नेत्यांकडून एखाद्या सणानिमित्त प्रादेशिक भाषेत शुभेच्छा देण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्या त्या भाषिक लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचा हा सर्वात चांगला मार्ग असल्यानेच याचा अवलंब विविध पक्षातील लोक करत आहेत. दरम्यान, याआधी राहुल गांधींनी शिवजयंतीलाही मराठीत ट्वीट करत शिवाजी महाराजांना अभिवादन केलं होतं.
आणखी वाचा























