(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Gandhi on Narendra Modi : गलवानवर आपला तिरंगाच चांगला वाटतो, राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा
"गलवानवर आपला तिरंगाच चांगला वाटतो, चीनला उत्तर द्यावं लागेल, मोदीजी मौन सोडा, असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे.
Rahul Gandhi on Narendra Modi : लदाखमधील गलवान खोऱ्यात चीनकडून (China) सतत घुसरखोरी करण्याचे प्रकार होत आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी चीनकडून गलवान खोऱ्यात त्यांचा राष्ट्रीय ध्वज फडकवल्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. चीनच्या या कृतीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे.
"गलवानवर आपला तिरंगाच चांगला वाटतो, चीनला उत्तर द्यावं लागेल, मोदीजी मौन सोडा, असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल गांधी यांचे हे ट्वीट काही वेळातच जवळपास चार हजार जणांनी रिट्वीट केले आहे. तर सोळा हजार जणांनी लाईक केले आहे.
गलवान पर हमारा तिरंगा ही अच्छा लगता है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 2, 2022
चीन को जवाब देना होगा।
मोदी जी, चुप्पी तोड़ो!
चीनच्या राष्ट्रीय वृत्तपत्रांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, गलवान खोऱ्यात फडकवण्यात आलेला ध्वज हा चीनचा राष्ट्रीय ध्वज आहे.
चीनने 23 ऑक्टोबर 2021 रोजी कोस्ट गार्ड कायदा हा नवा सीमा कायदा मंजूर केला आहे. तो 1 जानेवारी 2022 रोजी प्रत्यक्षात लागू केला आहे. सीमा आणि सागरी वाहतूक सुरक्षा कायद्याप्रमाणेच सीमा वादांसह चीन आणि शेजारील देशांमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा नवीन कायदा मंजूर करण्यात आला.
भारत-चीन वाद सुरूच
दोनवर्षापूर्वी म्हणजे 15 आणि 16 जून 2020 ला रात्री चीन सैनिकांसोबत झालेल्या चकमकीमध्ये 21 भारतीय जवान शहीद झाले होते. भारतीय सैनिकांनी आपले सामर्थ्य, साहस दाखवून चीनी सैनिकांचेही चांगलेच नुकसान केले होते. परंतु, चीनकडून अद्याप येथे घुसखोरी करण्याचे थांबले नाही. तर चीनने गलवानमधील काही भागही आपल्या ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. यावरूनच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
गलवान खोऱ्यात चीनकडून होणारी सततची घुसखोरी लक्षात घेत उत्तरेकडील सीमेवर राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत आहे. असे असले तरीही चीनकडून होणारी घुसखोरी सुरूच आहे.
महत्वाच्या बातम्या