(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Gandhi Reaction On Election Result 2023: जनतेचा आदेश आम्हाला मान्य, तेलंगणाच्या जनतेचेही मानले आभार, निवडणुकांच्या निकालानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Rahul Gandhi Reaction On Election Result 2023: राहुल गांधी यांनी चार राज्यांच्या निवडणूक निकालांवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : मध्य प्रदेश (Madhya Pradesh), छत्तीगड (Chhattisgarh ), राजस्थान (Rajasthan) आणि तेलंगणा (Telangana) या राज्यांच्या निवडणूक निकालांवर (Assembly Election Result) राहुल गांधींची (Rahul Gandhi) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये आम्हाला जनतेने दिलेला आदेश मान्य असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. त्याचप्रमाणे त्यांनी तेलंगणाच्या जनतेचे देखील आभार मानले आहेत.
राहुल गांधी यांनी म्हटलं?
मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ और राजस्थान का जनादेश हम विनम्रतापूर्वक स्वीकार करते हैं - विचारधारा की लड़ाई जारी रहेगी।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 3, 2023
तेलंगाना के लोगों को मेरा बहुत धन्यवाद - प्रजालु तेलंगाना बनाने का वादा हम ज़रूर पूरा करेंगे।
सभी कार्यकर्ताओं को उनकी मेहनत और समर्थन के लिए दिल से शुक्रिया।
राहुल गांधी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारत आहोत. आमच्या विचारधारेची लढाई सुरुच राहिल. मी तेलंगणाच्या जनतेचा खूप आभारी आहे. तेलंगणामध्ये विकास करण्याचे वचन आम्ही नक्कीच पूर्ण करू.सर्व कार्यकर्त्यांचे त्यांच्या परिश्रम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.
प्रियांका गांधींनी काय म्हटलं ?
प्रियांका गांधी यांनी देखील ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. तेलंगणातील जनतेने इतिहास रचला आहे आणि काँग्रेस पक्षाच्या बाजूने जनादेश दिला आहे. हा तेलंगणातील जनतेचा विजय आहे. हा राज्यातील जनतेचा आणि काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा विजय आहे, अशी भावना प्रियंका गांधी यांनी व्यक्त केली.
तेलंगाना की जनता ने इतिहास रचते हुए कांग्रेस पार्टी के पक्ष में जनादेश दिया है। यह प्रजाला तेलंगाना की जीत है। यह प्रदेश की जनता और कांग्रेस पार्टी के एक-एक कार्यकर्ता की जीत है।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 3, 2023
तेलंगाना की जनता को तह-ए-दिल से धन्यवाद।कांग्रेस पार्टी तेलंगाना में शांति, समृद्धि और प्रगति के…
पुढे त्यांनी म्हटलं की, मी तेलंगणातील जनतेचे मनापासून आभार मानते. तेलंगणात शांतता, समृद्धी आणि प्रगतीसाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या जनतेने काँग्रेस पक्षाला विरोधाची भूमिका सोपवली आहे आणि जनतेच्या निर्णयाचा आम्ही मनापासून स्विकार करतो.