गुजरातमधील 10 बेनामी पक्षांना मागील पाच वर्षात 4300 कोटींची देणगी, खर्च दाखवला 39 लाख; निवडणूक आयोग त्यांच्याकडे प्रतिज्ञापत्र मागणार का? राहुल यांची विचारणा
हे हजारो कोटी कुठून आले? त्यांना कोण चालवत आहे? पैसे कुठे गेले? आयोग चौकशी करेल का की प्रतिज्ञापत्र मागेल? की कायदा बदलेल, जेणेकरून हा डेटा देखील लपवता येईल? अशी विचारणा राहुल गांधी यांनी केली.

Rahul Gandhi on Gujarat: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुजरातमधील अज्ञात राजकीय पक्षांना मिळालेल्या 4300 कोटी रुपयांच्या देणगीबद्दल निवडणूक आयोगावर पुन्हा प्रश्नांची सरबत्ती केली आहे. राहुल गांधी यांनी दैनिक भास्करची अहवाल शेअर करत म्हटले आहे की, या 10 पक्षांनी एवढी मोठी देणगी घेतली, पण खर्च फक्त 39 लाख रुपये दाखवला.
गुजरात में कुछ ऐसी अनाम पार्टियां हैं जिनका नाम किसी ने नहीं सुना - लेकिन 4300 करोड़ का चंदा मिला!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 27, 2025
इन पार्टियों ने बहुत ही कम मौकों पर चुनाव लड़ा है, या उनपर खर्च किया है।
ये हजारों करोड़ आए कहां से? चला कौन रहा है इन्हें? और पैसा गया कहां?
क्या चुनाव आयोग जांच करेगा - या फिर… pic.twitter.com/CuP9elwPaY
हे हजारो कोटी कुठून आले? त्यांना कोण चालवत आहे?
त्यांनी X वर लिहिले की, गुजरातमध्ये काही अज्ञात पक्ष आहेत ज्यांचे नाव कोणीही ऐकले नाही, परंतु त्यांना 4300 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. या पक्षांनी फार कमी वेळा निवडणुका लढवल्या आहेत किंवा त्यावर खर्च केला आहे. हे हजारो कोटी कुठून आले? त्यांना कोण चालवत आहे? आणि पैसे कुठे गेले? निवडणूक आयोग चौकशी करेल का की ते येथेही प्रतिज्ञापत्र मागवेल? की ते स्वतः कायदा बदलेल, जेणेकरून हा डेटा देखील लपवता येईल?
राहुल गांधी सध्या बिहारमध्ये 16 दिवसांच्या 'मतदार हक्क यात्रे'वर आहेत. ही यात्रा 1300 किलोमीटरहून अधिक अंतर कापेल आणि 20 जिल्ह्यांमधून प्रवास केल्यानंतर 1 सप्टेंबर रोजी पाटणा येथे संपेल. यात्रेदरम्यान, काँग्रेस आणि राजद नेत्यांनी मतदार यादीतील अनियमितता आणि 'मतचोरीचे' आरोप केले आहेत.
गुजरातमध्ये 5 वर्षांत 4300 कोटी रुपये मिळाले
दरम्यान, गुजरातमध्ये नोंदणीकृत 10 निनावी राजकीय पक्षांना 2019-20 ते 2023-24 या पाच वर्षांत 4300 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. विशेष म्हणजे, या काळात गुजरातमध्ये झालेल्या तीन निवडणुकांमध्ये (2019, 2024 मध्ये दोन लोकसभा निवडणुका आणि 2020 मध्ये विधानसभा) या पक्षांनी फक्त 43 उमेदवार उभे केले आणि त्यांना एकूण 54 हजार 69 मते मिळाली. या पक्षांनी आणि त्यांच्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या अहवालांवरून हे उघड झाले आहे. निवडणूक अहवालात त्यांनी फक्त 39.02 लाख रुपये खर्च दाखवला आहे, तर ऑडिट अहवालात 3500 कोटी रुपये खर्च दाखवला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























