एक्स्प्लोर

'सीमेवरील सत्य सर्वांना माहितीय', राहुल गांधींची अमित शाहांवर शायराना अंदाजात टीका

सध्या पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरु आहे. यावरुन आता देशात राजकारण सुरु झालं आहे. भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी याबाबत शायराना अंदाजात टीका केलीय.

नवी दिल्ली : सध्या पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरु आहे. तिथे काही भागांमध्ये दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने उभे ठाकले आहे. यावरुन आता देशात राजकारण देखील पेटलं आहे. भारताचे गृहमंत्री अमित शाह यांना काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना शायराना अंदाजात उत्तर दिलं आहे. गालिबच्या सबको मालूम है जन्नत की हकीकत लेकीन.. या प्रसिद्ध शायरीवरुन प्रेरणा घेत राहुल गांधी यांनी, 'सब को मालूम है ‘सीमा’ की हक़ीक़त लेकिन,दिल के ख़ुश रखने को, ‘शाह-यद’ ये ख़्याल अच्छा है', असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

काल साधारण साडे चार वाजता गृहमंत्री अमित शाह यांनी चीन बरोबर सुरु असलेल्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या संरक्षण धोरणाचे समर्थन करत एक वक्तव्य केलं होतं. भारताच्या संरक्षण धोरणाला जागतिक मान्यता मिळाली आहे. अमेरिका आणि इस्रायलनंतर आपल्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी कुठला देश सक्षम असेल तर, तो भारत आहे. संपूर्ण जगाने हे मान्य केले आहे, असं अमित शाह यांनी बिहारमधील डिजिटल सभेला संबोधित म्हटलं होता. अमित शाह यांचे हे वक्तव्य कोट करत राहुल गांधी यांनी शायरीच्या माध्यमातून टोला लगावला आहे.

भारत-चीन सीमावादावर महत्वाची बैठक पूर्ण; चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न भारत-चीन सीमेवर दिवसेंदिवस तणाव वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भारत चीनमध्ये सीमावादावर नुकतीच एक महत्वाची बैठक पार पडली. दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर स्तरावरची ही सर्वोच्च चर्चा वाढलेल्या तणावाला शांत करु शकणार का हा प्रश्न आहे. पण, किमान दोन्ही देशांमध्ये चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होतोय ही बाब यातून अधोरेखित झालीय. लडाखच्या सीमेवर दोन्ही बाजूंमध्ये ले. जनरल स्तरावर ही बातचीत झाली. गेल्या 32 दिवसांपासून सुरु असलेल्या सीमावादावर काय तोडगा निघतो याकडे दोन्ही देशातील नागरिकांचे लक्ष आहे.

चिनी वस्तू भारतीयांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग, बहिष्काराची मोहीम अपयशी ठरेल; चीनने भारताला खिजवलं

भारत आणि चीनमध्ये लष्करी प्रोटोकॉलनुसार फील्ड स्तरावरची सर्वोच्च बैठक पार पडली. गेल्या महिनाभरापासून चीन सीमेवर वाढलेल्या तणावाचा प्रश्न संवादानं मिटवण्याचा प्रयत्न दोन्ही देशांकडून झाला. भारताकडून ले जनरल हरिंदर सिंह यांनी या बैठकीत सहभाग घेतला होता. भारत चीनमध्ये तणाव का वाढला
  • 5 मे रोजी लडाखमध्ये भारत आणि चीनी सैन्यांमध्ये झडप
  • लडाखमधल्या गैलवान पर्वताजवळच्या प्रदेशात सैन्याच्या जमवाजमवीवरुन हा वाद सुरु झाला. त्याची झळ नंतर लडाखच्या पँगाँग तलावापर्यंत पोहचली.
  • या तलावाच्या आसपास असलेल्या डोंगररांगामध्ये दोन्ही देशांचे फिंगर एरिया ठरलेले आहेत. पण एकमेकांच्या फिंगर एरियात अतिक्रमण केल्यानं वाद पेटला.
  • भारत-चीनचे 250 जवान एकमेकांसमोर उभे ठाकले, दगडफेक आणि मारामारीत काही जण जखमीही झाले.

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Embed widget