एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राफेल डीलबाबत सरकारला हवाई दलाची साथ
हे बोल्ड पाऊल असल्याचं सांगत हवाई दलाच्या प्रमुखांनी याचं समर्थन केलं आहे.
नवी दिल्ली : राफेल डीलवरुन विरोधकांनी घेरलेल्या केंद्र सरकारला हवाई दलाचे प्रमुख बीएस धनोआ यांनी दिलासा दिला आहे. हे बोल्ड पाऊल असल्याचं सांगत हवाई दलाच्या प्रमुखांनी याचं समर्थन केलं आहे. राजधानी दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत धनोआ म्हणाले की, "राफेल आणि S-400 एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम डील ही बूस्टर डोससारखा आहे. सरकारने S-400 एअर डिफेन्स सिस्टम डीलला मंजुरी दिल्यानंतर ती विमानं 24 महिन्यात आम्हाला मिळतील."
'लढाऊ विमानं मिळण्यात उशिर ही चिंतेची बाब'
वायुसेनेच्या प्रमुखांनी स्क्वॉड्रनच्या घसरत्या संख्येवरही चिंता व्यक्त केली आहे. HAL सोबत करार केल्यानंतरही डिलिव्हरीमध्ये उशिर झाला. सुखोई-30 च्या डिलिव्हरीमध्ये तीन वर्षांचा उशिर, लढाऊ विमान जॅग्वारमध्ये सहा वर्षांचा उशिर झाला आहे. एलसीएमध्ये 5 वर्ष, मिराज 2000 च्या डिलिव्हरीमध्ये दोन वर्षांचा उशिर झाला आहे, धानाओ यांनी सांगितलं.
'राफेल विमान खरेदी करुन सरकारचं बोल्ड पाऊल'
राफेल डीलच्या प्रश्नावर बीएस धनोआ म्हणाले की, "आम्ही कठीण परिस्थितीत होतो. आमच्याकडे तीन पर्याय होते. पहिला पर्याय होता की काही कमी होण्याची वाट पाहणं, आरपीएफ काढणं, किंवा तातडीने खरेदी करणं. आम्ही तातडीने खरेदी केली. राफेल डील आमच्यासाठी बूस्टर डोससारखी आहे."
"सरकारने हे बोल्ड पाऊल उचलत 36 राफेल लढाऊ विमानांची खरेदी केली. उच्च कामगिरी करणारं आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुज्ज लढाऊ विमान भारतीय हवाई दलाला दिलं आहे. जेणेकरुन आम्ही आपली क्षमता वाढवू शकतो," असं धनोआ यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
Advertisement