एक्स्प्लोर
Advertisement
Punjab Assembly Election Result 2017: पंजाबचा निकाल
चंदीगड : पंजाब विधानसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाला मोठा धक्का बसला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. काँग्रेसने बहुमताचा 59 हा आकडा सहजरित्या पार केला आहे.
काँग्रेसने 70 जागा जिंकल्या असून 8 जागांवर उमेदवार आघाडीवर आहे. तर आम आदमी पक्ष राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर शिरोमणी अकाली दल आणि भाजप युतीला अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत.
काँग्रेस : 78
आम आदमी पक्ष : 20
अकाली दल 14 + भाजप 3 : 17
लोक इन्साफ पार्टी : 02
कॅप्टन अमरिंदर सिंह पटियालामधून विजयी
कॅप्टन अमरिंदर सिंह पटियाला आणि लम्बी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु त्यांचा पटियाला मतदारसंघातून विजय झाला. तर लम्बीमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी विजय मिळवला. दरम्यान कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा आज 75 वा वाढदिवस आहे.
मोदींकडून अमरिंदर सिंह यांचं अभिनंदन
कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने पंजाबमध्ये मोठा विजय मिळवला. त्यानतंर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरुन अमरिंदर सिंह यांचं अभिनंदन केलं.
काँग्रेसचा पुनर्जन्म झाला
तर निवडणुकीपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये आलेल्या नवज्योतसिंह सिद्धू यांचाही अमृतसर मतदारसंघातून विजयी झाले. जनतेने दुष्टांच्या अहंकाराला नामोहरम केलं. पंजाबमध्ये काँग्रेसचा पुनर्जन्म झाला, बदल्याची भावना मागे सोडून विकास करायचा आहे, अशी प्रतिक्रिया नवज्योतसिंह सिद्धू यांनी दिली.
----------------------
चंदीगड: पंजाबमध्ये कुणाचं सरकार येणार, हे काही क्षणात समजणार आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी अकाली आणि भाजपला धक्का बसण्याचे संकेत मिळत आहेत. पण काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यादोन्ही पक्षांमध्ये इथे रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
- पंजाब- अकाली+भाजप 18, काँग्रेस 76, आप 26, इतर
- अकाली+भाजप 17, काँग्रेस 77, आप 23, इतर 0
LIVE UPDATE
- जनतेने दुष्टांच्या अहंकाराला नामोहरम केलं,पंजाबमध्ये काँग्रेसचा पुनर्जन्म झाला, बदल्याची भावना मागे सोडून विकास करायचा आहे : नवज्योत सिद्धू
झालं गेलं विसरा, पंजाबच्या विकासासाठी सर्वांनी सोबत या, मोठ्या विजयानंतर नवज्योतसिंह सिद्धू यांची प्रतिक्रिया
- पंजाब- अकाली+भाजप 28, काँग्रेस 63, आप 26, इतर
- पंजाब- अकाली+भाजप 26, काँग्रेस 59, आप 24, इतर 2
- पंजाब- अकाली+भाजप 21, काँग्रेस 55, आप 21, इतर 3
- पंजाब- अकाली+भाजप 14, काँग्रेस 55, आप 23, इतर 2
- पंजाब- अकाली+भाजप 18, काँग्रेस 43, आप 21, इतर 2
- पंजाब- अकाली+भाजप 15, काँग्रेस 35, आप 17, इतर 2
- अकाली+भाजप10, काँग्रेस 25, आप 13, इतर 0
- पंजाबमध्ये काँग्रेस मोठ्या आघाडीच्या
- अकाली+भाजप10, काँग्रेस 25, आप 13, इतर 0
- पंजाब- अकाली+भाजप 6, काँग्रेस 23, आप 14, इतर 0
- पंजाब - अकाली+भाजप 5, काँग्रेस 18, आप 10, इतर 0
- पंजाब - अकाली+भाजप 4, काँग्रेस 18, आप 9, इतर 0
- पंजाबमध्ये काँग्रेस मोठ्या आघाडीच्या दिशेने
- मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल आघाडीवर
- काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंह पिछाडीवर
सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि पहिले कल हाती येतील. या निवडणुकीचं इत्यंभुत कव्हरेज करण्यासाठी माझाची टीम या सर्व राज्यांमध्ये सज्ज आहे.
पंजाबमधील 117 जागांसाठी मतदान झालं आहे. मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement