नगराध्यक्ष आरक्षण सोडत : कोल्हापुरात गडहिंग्लज अनुसूचित जाती पुरुष, पन्हाळ्यात महिला ओपन; शिरोळ, कागल, मुरगूड, कुरुंदवाडमध्ये कोणाला संधी?
कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज, पन्हाळा, कागल, मुरगुड आणि कुरुंदवाड येथे महिलाराज निश्चित झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांची मोठी कसोटी ठरणार आहे.

Maharashtra Nagaradhyaksh Sodat 2025: राज्यातील 147 नगरपंचायतींसाठी (147 Nagar Panchayat Reservation Maharashtra) नगराध्यक्ष सोडत आज (6 ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली. महिलांसाठी 74 जागा राखीव झाल्या आहेत. त्यामधील सर्वसाधारण महिलांसाठी 38 जागा राखीव झाल्या आहेत. अनुसूचित जातींसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 7 आणि मागासवर्ग प्रवर्गासाठी 20 जागा राखीव झाल्या आहेत. आज राज्यातील विविध नगरपालिकांसाठी नगराध्यक्ष सोडत निश्चित झाल्याने निवडणूक रणधुमाळीला आणखी जोर येणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिलाराज
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नगरपंचायत आणि नगरपरिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिलाराज (Women Reservation Nagar Panchayat Election) असणार आहे. गडहिंग्लज नगर परिषदेसाठी अनुसूचित जाती पुरुष आरक्षण जाहीर झालं आहे. पन्हाळ्यामध्ये महिला ओपन, कागलमध्ये महिला ओपन, मुरगुडमध्ये महिला ओपन, कुरुंदवाडमध्ये महिला ओपन आणि शिरोळमध्ये अनुसूचित जाती महिला असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आरक्षण निश्चित झाल्याने आता उमेदवार निश्चितीसाठी सुद्धा वेग येणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीच्या नेत्यांची कसोटी
दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीला 10 पैकी 10 जागांवर यश मिळालं आहे. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्षांकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. हीच गर्दी आता महायुतीची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील प्रत्येक पक्षाने जागा वाटपात आम्हालाच सर्वाधिक वाटा मिळाला पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषद निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. त्यामुळे या निवडणुकीत कोणत्याही कार्यकर्त्याचा बळी दिला जाणार नाही. पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील अशी भूमिका भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil on Kolhapur ZP Election) यांनी घेतली. तर जमेल त्या ठिकाणी महायुती म्हणून आणि जमणार नाही त्या ठिकाणी स्वबळावर लढणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी (Hasan Mushrif on Mahayuti Election Strategy) म्हटलं आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या



















