एक्स्प्लोर

ओम पैठणे... पुण्याचा ओला ड्रायव्हर ते भारतीय सैन्य अधिकारी

एके दिवशी एका प्रवाशाने ओला बुक केली. तो प्रवासी होता आर्मी कर्नल. प्रवासादरम्यान दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. बोलता-बोलता विषय निघाला सैन्य दलाचा.

मुंबई : स्वप्नांना इच्छाशक्ती आणि मेहनतीची जोड लागली, तर माणूस कुठलीही गोष्ट साध्य करु शकतो, याचं उदाहरण पुण्यात पाहायला मिळालं आहे. पुण्याचा ओला कॅब चालक ओम पैठणे आता चक्क भारतीय सैन्यदलात दाखल होत आहे. मेजर गौरव आर्य यांनी ट्विटरवरुन कॅडेट ओम पैठणेची प्रेरणादायी कहाणी शेअर केली आहे. ओम पैठणे हा पुण्याचा रहिवासी. ओला कॅबमध्ये तो ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. त्याच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. त्यामुळे अहोरात्र मेहनत करुन कुटुंबाचं पोट ओम भरत होता. ओला टॅक्सी चालवण्याची नोकरीच त्याच्या स्वप्नपूर्तीचा दुवा ठरली. एके दिवशी एका प्रवाशाने ओला बुक केली. तो प्रवासी होता आर्मी कर्नल. प्रवासादरम्यान दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. बोलता-बोलता विषय निघाला सैन्य दलाचा. कर्नलनी ओमला लष्कराविषयी भरभरुन सांगितलं. हे ऐकून ओम भारावून गेला. ओमने कर्नलसाहेबांकडून प्रेरणा घेतली आणि लष्करात भर्ती होण्याच्या स्वप्नाने तो झपाटून गेला. मेहनत करुन त्याने ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी जॉईन केली. सशस्त्र सीमा दलाची परीक्षा ओमने दिली आणि तो पास झाला. कॅडेट ओम पैठणे दहा मार्च रोजी ऑफिसर म्हणून पासआऊट होणार आहे. महत्त्वांकाक्षा असेल आणि चिकाटीने मेहनत करण्याची तयारी असेल, तर कोणतंही स्वप्न साध्य करता येतं, हे ओम पैठणेच्या उदाहरणातून नक्कीच शिकता येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget