एक्स्प्लोर
Pulwama terror attack : प्रत्येक शहीदाच्या कुटुंबीयांना अमिताभ बच्चन देणार 5 लाख रुपये
जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे जवान शहीद झाले. शहीद झालेल्या प्रत्येक जवानांच्या कुटुंबीयांना बॉलिवूडचे महानायक प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत करणार आहे.
मुंबई : जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे जवान शहीद झाले. शहीद झालेल्या प्रत्येक जवानांच्या कुटुंबीयांना बॉलिवूडचे महानायक प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत करणार आहे.
अमिताभ बच्चन यांनी एका ट्वीटला रिप्लाय करताना म्हटले आहे की, "या हल्ल्यात 49 जवान शहीद झाले आहेत. प्रत्येक जवानाच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख असे एकूण अडीच कोटी रुपये दिले जाणार आहेत."
अमिताभ बच्चन यांच्या प्रवक्त्यानेदेखील या बातमीला दुजोरा दिला आहे. मदत कशा प्रकारे शहीदांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवली जाईल, याबाबत सध्या विचार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान शुक्रवारी अमिताभ बच्चन एका खासगी कार्यक्रमाला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत हजेरी लावणार होते. परंतु पुलवामा येथील दुःखद घटनेमुळे बच्चन यांनी या कार्यक्रमाला जाणे टाळले.
पुलवामा येथे सीआरपीफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाले. महाराष्ट्राच्या दोन्ही शहीद जवानांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारने प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
संबधित बातमी शहीदांच्या कुटुंबांना 50 लाखांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणाthe number of the martyr has gone up to 49 .. i am contributing for now 50 .. thats 2.5 cr
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 16, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement