एक्स्प्लोर
जेव्हा किरण बेदी काँग्रेस आमदाराच्या पाया पडतात...
पुदुच्चेरी : पुदुच्चेरीच्या उपराज्यपालपदी नियुक्ती झालेल्या आयपीएस अधिकारी किरण बेदी एका महिला आमदाराच्या पाया पडल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
उपराज्यपालपदी किरण बेदींची नियुक्ती झाल्यानंतर सर्वपक्षीयांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सोमवारी पुदुच्चेरीतील एका कार्यक्रमात काँग्रेसचे संभाव्य मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी किरण बेदींची ओळख काँग्रेसच्या एका महिला आमदाराशी करुन दिली.
यावेळी किरण बेदींचा मान राखण्यासाठी संबंधित महिला आमदार त्यांच्यापुढे नतमस्तक झाल्या. त्यामुळे किरण बेदींनीही त्याचप्रमाणे महिला आमदाराचे पाय धरले आणि 'यापुढे असं करु नका' असं बजावलं.
किरण बेदी या भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यंदा त्या पुदुच्चेरीच्या उपराज्यपालपदी नियुक्त झाल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
Advertisement