एक्स्प्लोर
विना हेल्मेट प्रवास केल्यानं किरण बेदींवर नेटिझन्सची टीका
पुदुच्चेरीच्या उपराज्यपाल किरण बेदींची विना हेल्मेट गाडीवरून फिरतानाची दृश्यं व्हायरल होत आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर नेटिझन्सकडून टीकेची झोड उठवण्यात येत आहे.
पुदुच्चेरी : पुदुच्चेरीच्या उपराज्यपाल किरण बेदी यांची गाडीवरून फिरताना हेल्मेट न घातलली काही दृश्यं व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये किरण बेदी या गाडीवर एका महिलेच्या पाठीमागे बसल्या आहेत. मात्र त्यांनी हेल्मेट घातेलेले नाहीये.
शुक्रवारी रात्री किरण बेदी जेव्हा महिला सुरक्षेची तयारी पाहण्यासाठी बाहेर पडल्या, तेव्हाची ही दृश्यं आहेत. किरण बेदी जेव्हा वाहतूक पोलीस सेवेतमध्ये कार्यरत होत्या, त्यांच्या कार्यकाळात त्या कडक वाहतूक शिस्तीसाठी ओळखल्या जात होत्या.
विशेष म्हणजे किरण बेदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला असून, यात त्यांनी पुदुच्चेरीत रात्रीच्या काळी महिला कितपत सुरक्षित आहेत, हे पाहण्यासाठी आपण दुचाकीवरुन ही रपेट मारल्याचं म्हटलंय. दरम्यान, किरण बेदी यांच्या या व्हिडीओवरुन नेटिझन्सनी त्यांच्यावर टीका केली आहे. शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किरण बेदींकडून वाहूतक शिस्तिचं पालन होत नसल्यानं, नेटिझन्सनी यावर कमालीची नाराजी व्यक्त केली आहे.A clip of Night Round done 'incognito' to check how safe was it for women++during late night hours. Helped identify areas for improvement.. pic.twitter.com/1BeMsL1JQX
— Kiran Bedi (@thekiranbedi) August 19, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement