एक्स्प्लोर

Central Government Schemes : केंद्र सरकारच्या गेल्या आठ वर्षांतील लोकोपयोगी योजना; जाणून घ्या तपशील

Central Govt Best Schemes : आठ वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारने देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने अनेक मोठे निर्णय घेतले. याच योजनांविषयी जाणून घेऊयात.

Central Govt Best Schemes : केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारला याच वर्षी आठ वर्ष पूर्ण झाली. या आठ वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारने देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने अनेक मोठे निर्णय घेतले. सर्वसामान्यांच्या हिताच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण योजना राबविल्या. या योजनांचा अनेकांनी लाभ घेतला. या निमित्तानं मोदी सरकारच्या आठ वर्षातील अत्यंत महत्वाच्या आणि चर्चेत असलेल्या आठ योजनांविषयी जाणून घेऊयात.

मोदी सरकारच्या महत्त्वपूर्ण योजना : 

1. जन धन योजना (Jan Dhan Yojana) :

देशातील प्रत्येक कुटुंबाला बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी जन धन योजना सुरू केली. ही योजना तळागाळात राबविण्यात मोदी सरकारला यश आलं. जन धन योजनेअंतर्गत देशात आतापर्यंत 45 कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली आहेत. तसेच, पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या नावावर जनधन खाती अधिक उघडली जात असल्याचं समोर आलं आहे. याच खात्यावर नागरिकांना वेगवेगळ्या सबसीडींचा लाभ देण्यात येतो. 

2. उज्ज्वला योजना (Ujjwala Yojana) :

केंद्र सरकारची उज्ज्वला योजना (Ujjwala Yojana) ही ग्रामीण महिलांमध्ये सर्वात लोकप्रिय योजना मानली जाते. या अंतर्गत सरकार गरीब कुटुंबांना घरगुती स्वयंपाकाचा गॅस कनेक्शन मोफत पुरवते. ही योजना 1 मे 2016 रोजी सुरू झाली. उज्ज्वला योजनेचा लाभ अनेकांना झाला. 

3. पीएम किसान सन्मान निधी (Kisan Samman Nidhi Yojana) :

पंतप्रधान मोदींनी ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Kisan Samman Nidhi Yojana) 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी सुरू केली. या अंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6000 रुपये जमा करते. ही रक्कम प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. 

4. आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) :

आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) हा केंद्र सरकारचा प्रमुख कार्यक्रम आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना 5 लाख रूपयांपर्यंत मोफत उपचार केले जातात. या योजनेच्या कक्षेत येणाऱ्या लोकांच्या गंभीर आजारांवर उपचार केवळ सरकारीच नाही तर आता खासगी हॉस्पिटलमध्येही केले जातील, असे खुद्द पीएम मोदींनी म्हटले आहे. 

5. स्वच्छ भारत मिशन (Swachh Bharat Mission) :

पंतप्रधानांच्या योजनेतील स्वच्छ भारत अभियान हा एक महत्वाचा उपक्रम. स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात स्वच्छतेला चालना देण्यासाठी मोफत शौचालये बांधली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 2 ऑक्टोबर 2014 रोजी देशभरात 'स्वच्छ भारत' हा उपक्रम सुरु केला होता. 

6. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (Pradhan Mantri Garib Kalyan Yojana) :

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना कोरोना काळात सुरु करण्यात आली. 26 मार्च 2020 रोजी या योजनेची घोषणा झाली. योजना आणण्यामागे सरकारचा उद्देश असा आहे की, देशात कुणीही उपाशी राहू नये. सरकारचा दावा आहे की, जवळपास 80 लाख लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे. प्रत्येक नागरिकाला या योजने अंतर्गत 5 किलो खाद्यान्न दिले जाते.  

7. जल जीवन मिशन (Jal Jeevan Mission) :  

जल जीवन योजना. या योजनेच्या नावावरूनच अंदाज येत असेल की ही योजना सर्वसामान्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आहे. 2024 पर्यंत प्रत्येक घरांत स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याचं मोदी सरकारचं ध्येय आहे. 'हर घर नल योजना' ही जल जीवन मिशन या नावाने देखील ओळखली जाते. या योजनेंतर्गत प्रत्येक माणसाला 55 लीटर पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करुन देण्याचं टार्गेट आहे. 2019 साली ही योजना सुरु करण्यात आली. 

8. प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana) :

या योजनेअंतर्गत लोकांना घर बांधण्यासाठी मदत केली जाते. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कच्ची घरे असलेल्या शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना घरे दिली जातात. यामध्ये लोकांना कमी दरात कर्ज दिले जाते. ज्यामध्ये सबसिडी दिली जाते. त्याच वेळी, या कर्जाची परतफेड करण्यासाठी 20 वर्षांपर्यंत उपलब्ध आहेत. या योजनेंतर्गत सरकारने 2022 पर्यंत ग्रामीण भागात 2 कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ही योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget