एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एअर इंडियाची विक्री महाघोटाळ्याची सुरुवात असेल : सुब्रमण्यम स्वामी
एअर इंडियाचा महाराजा आता विक्रीला निघणार असल्याचे संकेत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिले होते. त्यावरुन भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सरकारच्या निर्णयावर निशाणा साधला.
मुंबई : ''एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीची प्रस्तावित विक्री ही आणखी एका महाघोटाळ्याची सुरुवात असेल. या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे, असं काही आढळून आल्यास कायदेशीर तक्रार दाखल करु,'' असं ट्वीट भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. त्यामुळे आपल्याच पक्षाला त्यांनी पुन्हा एकदा घरचा आहेर दिला आहे.
एअर इंडियाचा महाराजा आता विक्रीला निघणार असल्याचे संकेत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिले होते. केंद्र सरकारच्या तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत अर्थमंत्र्यांनी हे संकेत दिले होते. सुयोग्य गुंतवणूकदार मिळाल्यास सरकारने 'एअर इंडिया'मधून पूर्णपणे अंग काढून घ्यावं, या मताशी सरकार अनुकूल असल्याचं ते म्हणाले होते. सध्या 'एअर इंडिया'चा बाजारपेठेतील हिस्सा अत्यंत कमी आहे. त्यातच कंपनीवर 50 हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर असल्याने सरकार ही कंपनी विकणार असल्याची चर्चा आहे. संबंधित बातम्या :The proposed sale of Air India is potentially another scam in the making. Selling family silver is not divestment. I am watching who is doing what and will, if I see culpability, file a private criminal law complaint.
— Subramanian Swamy (@Swamy39) March 31, 2018
एअर इंडियाचं खासगीकरण होण्याची शक्यता, अरुण जेटलींचे संकेत
यूपीए सरकारमध्ये महाघोटाळा? CBI कडून गुन्हा दाखल
टाटा समूह तोट्यातील एअर इंडियाला विकत घेण्याच्या तयारीत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement