Priyanka Gandhi : प्रियांका गांधींच्या अडचणी वाढल्या, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून चार्जशीटमध्ये पहिल्यांदाच उल्लेख
Priyanka Gandhi : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. जमीन घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून पहिल्यांदाच त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीने प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वड्रा यांच्या समवेत त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.
Priyanka Gandhi : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka gandhi) यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. जमीन घोटाळ्याशी (Land Scam) संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून पहिल्यांदाच त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीने प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वड्रा (Robert Vadra) यांच्या समवेत त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. सीसी थंपी आणि सुमित चड्ढा यांच्या विरोधातील चार्जशीटमध्ये हा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, त्यांना या प्रकरणी आरोपी करण्यात आलेले नाही.
रॉबर्ट वड्रा यांच्या निकटवर्तीयांकडून आर्थिक गैरव्यवहार (ROBERT VADRA)
चार्जशीटमध्ये प्रियांका गांधींचे नाव जोडल्यानंतर काँग्रेस पक्ष कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. रॉबर्ट वड्रा आणि थंपी यांच्याबरोबरच प्रियंका गांधींनीही फरिदाबादमध्ये जमीन खरेदी केली होती. रॉबर्ट वड्रा यांचे निकटवर्तीय संजय भंडारी यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास सध्या ईडी करत आहे. या तपासातूनच ही माहिती समोर आली आहे. मात्र, या प्रकरणी प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वड्रा अजून तरी आरोपी नाहीत, असे ईडीने स्पष्ट केले आहे.
जमीन घोटाळ्याचे प्रकरण काय आहे? (Land Scam)
फरिदाबाद येथील जमीन खरेदीबाबतचे हे प्रकरण आहे. फरिदाबाद येथील अमीपूर येथे सन 2005-2006 एचएल पाहवा या प्रॉपर्टी डिलरकडून रॉबर्ट वड्रा यांनी जमीन खरेदी केली होती. ही जवळपास 40.8 एकर इतकी आहे. ही जमीन 2010 साली पुन्हा पाहवा यांनाच विकण्यात आली होती. याशिवाय प्रियांका गांधी-वाड्रा यांच्या नावानेही जमीन खरेदी करण्यात आली होती. ही जमीन देखील अमीपूर गावातील होती. 2006 मध्ये या जमीनीचा व्यवहार झाला होता. यानंतर 2010 मध्ये ही जमीन देखील विकण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, पाहवा हे सीसी थंपी यांच्या निकटवर्तीय आहेत. अमीपूरमध्ये थंपी यांनीही जमीन खरेदी केली होती.
रॉबर्ट वड्रा यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप (ROBERT VADRA)
सक्तवसुली संचनालयाने (ईडी) रॉबर्ट वड्रा यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. लंडन येथे रॉबर्ट वड्रा यांच्या घर होते. एलर्टन हाउस, ब्रायनस्टन स्क्वायर (Ellerton House, Bryanston Square)असे रॉबर्ट वड्रा यांच्या घराचे नाव आहे. वड्रा यांचे हे घर प्रॉपर्टी डिलर संजय भंडारी यांनी 2009 मध्ये खरेदी केले होते. त्यानंतर सीसी थंपी यांनी 2010 मध्ये या स्थावर मालमत्तेचा व्यवहार केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
Nagpur Congress Maharally : काँग्रेसचा स्थापना दिवस, नागपुरात सभेसाठी एकूण 3 स्टेज उभारले ABP Majha