Delhi-Mumbai Expressway: पंतप्रधान मोदी रविवारी करणार दिल्ली-मुंबई महामार्गाचं उद्घाटन, गडकरींनी शेअर केला व्हिडीओ; आनंद महिंद्रा म्हणाले...
Delhi-Mumbai Expressway: दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा पहिला टप्पा तयार झाला आहे. रविवारी (12 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी या महामार्गाचं उद्घाटन करणार आहेत.
Delhi-Mumbai Expressway: दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा पहिला टप्पा तयार झाला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी या महामार्गाचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता, त्यानंतर या महामार्गाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. रविवारी (12 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) या महामार्गाचं उद्घाटन करणार आहेत.
Delhi-Mumbai Expressway: दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग
केंद्र सरकारच्या (central government) मुख्य प्रकल्पांमध्ये समाविष्ट असलेल्या दिल्ली मुंबई-एक्स्प्रेस वेच्या (Delhi-Mumbai Expressway) पहिल्या टप्प्याचे (246 किमी) काम पूर्ण झाले आहे, ज्यासाठी सुमारे 12,150 कोटी रुपये खर्च आला आहे. पूर्ण झाल्यानंतर हा एक्स्प्रेस वे देशातील सर्वात मोठा एक्स्प्रेस वे (Delhi-Mumbai Expressway) असेल. ज्याची लांबी 1,386 किमी असेल. हे काम पूर्णपणे तयार झाल्यानंतर दिल्ली ते मुंबई (Mumbai) हे अंतर 1,242 किमी होईल, जे आता 1424 किमी आहे. तसेच प्रवासाचा वेळ देखील 24 तासांवरून 12 तासांपर्यंत कमी होईल, म्हणजेच हा वेळ जवळजवळ निम्मा होईल. सध्या हा द्रुतगती मार्ग 8 लेनमध्ये तयार करण्यात येत असून भविष्यात 12 लेनचा बनवला जाऊ शकतो. जनावरांना रस्ता ओलांडण्यासाठी या एक्स्प्रेस वेमध्ये (Delhi-Mumbai Expressway) अॅनिमल पास बनवले जाणार आहेत, जेणेकरून जनावरांमुळे होणारे अपघात टाळता येतील.
Aesthetic night views from the architectural marvel #Delhi_Mumbai_Expressway. Have a look!!#BuildingTheNation #PragatiKaHighway #GatiShakti pic.twitter.com/akjlyDVwnw
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 10, 2023
Delhi-Mumbai Expressway: नितीन गडकरी यांनी ट्वीट केला व्हिडीओ
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर दिल्ली (Delhi) मुंबई (Mumbai) एक्सप्रेस वेचा (Delhi-Mumbai Expressway) व्हिडीओ पोस्ट केला होता. जो काही वेळातच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला होता. लाखो लोकांनी हा व्हिडीओ (Video) पाहिला आहे.
उद्योगपती आनंद महिंद्रा (anand mahindra) देखील हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहू शकले नाहीत. रिट्विट करत त्यांनी लिहिले, "तुम्ही आम्हाला आठवण करून देत आहात की इन्फ्रास्ट्रक्चर बोरिंग नाही, तर ही एक जादूही असू शकते.''
You’ve reminded us that infrastructure isn’t boring—it can be magical. I was planning to drive on this expressway-no, dreamway-in the day, but now I think I will plan a night cruise… 👍🏽👍🏽👍🏽 https://t.co/peCFsblv2J
— anand mahindra (@anandmahindra) February 10, 2023