Presidential Election 2022 : आज राष्ट्रपतीपदासाठी मतदान, कोण मारणार बाजी? निकाल कधी? वाचा सविस्तर
Presidential Election 2022 : आज राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. याचा निकाल 21 जुलै रोजी लागणार आहे. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी तर यशवंत सिन्हा विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत.
Presidential Election 2022 : लवकरच भारताला नवे राष्ट्रपती मिळतील. राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान पार पडणार आहे. या मतदानाचा निकाल 21 जुलै रोजी लागणार आहे. त्यानंतर 25 जुलै रोजा नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल. संसदेत मतदानाच्या प्रक्रियेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. संसद भवनातील खोली क्रमांक 63 मध्ये मतदानासाठी 6 बूथ उभारण्यात आले आहेत. यामध्ये एक बूथ दिव्यांग वोटरसाठी असेल. वेगवेगळ्या राज्यांचे नऊ आमदार संसद भवनामध्ये मतदान करतील, यामध्ये उत्तर प्रदेशमधील 4, त्रिपुरामधील 2, आसाममधील एक, ओडिशामधील एक आणि हरयाणातील एका आमदाराचा समावेश आहे. तर 42 खासदार विधानसभेत मतदान करतील.
एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी
राष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. द्रौपदी मुर्मू या ओदिशातील आदिवासी नेत्या आहेत. राजकीय बलाबल पाहता एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांच्या रुपाने देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळण्याची शक्यता आहे. द्रौपदी मुर्मू यांनी 2015 ते 2021 याकाळात झारखंडच्या राज्यपालांची जबाबदारी सांभाळली.
एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचं पारडं जड
महिला, दलित, मुस्लीम आणि दक्षिण भारतातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. पण आदिवासी समाज यापासून वंचित राहिला होता. त्यामुळे आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळावी अशी मागणी केली जात होती. द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाल्यास राष्ट्रपतीपदी विराजमान होणाऱ्या महिल्या आदिवासी महिला ठरतील.
यशवंत सिन्हा विरोधी पक्षाचे उमेदवार
यशवंत सिन्हा यांनी 24 वर्षे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली. यादरम्यान त्यांनी बिहार सरकारच्या वित्त मंत्रालयात सचिव आणि उपसचिव म्हणून दोन वर्षे काम केले. यानंतर त्यांची भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयात उपसचिव पदावर नियुक्ती झाली. 1971 ते 1974 या काळात त्यांची जर्मनीतील भारतीय दूतावासाचे प्रथम सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
राष्ट्रपतीची निवडणूक कशी होणार?
- इलेक्टोरल कोलेजच्या माध्यमातून राष्ट्रपतीची निवड होणार.
- लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार यामध्ये मतदान करतील.
- राज्यातील तसेच दिल्ली आणि पॉंडिचेरीतील विधानसभेतील निवडून आलेले सदस्य यामध्ये मतदान करतील.
- नामनिर्देशित सदस्यांना या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार नाही.
मतदान प्रक्रिया काय आहे?
निवडणूक गुप्त मतदानाने घेतली जाते. या प्रणालीमध्ये मतदाराला उमेदवारांच्या नावासमोर पसंती दर्शवावी लागते. मतदारांनी निष्ठेने मतदानाची गुप्तता पाळणे अपेक्षित आहे. या निवडणुकीत खुल्या मतदानाची संकल्पना नसून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत कोणालाही मतपत्रिका दाखवण्यास सक्त मनाई आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Presidential Elections 2022 : देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळण्याची शक्यता; एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचं पारडं जड
- Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, शरद पवारांसह राहुल गांधी उपस्थित
- Vice President Election 2022: जगदीप धनकड उपराष्ट्रपती होणार का? जाणून घ्या काय आहेत राजकीय समीकरणे