एक्स्प्लोर

राष्ट्रपती निवडणूक : विरोधकांमध्ये फूट, काँग्रेसच्या नेतृत्वात 17 पक्षांची बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेतृत्वात आज 17 विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. मात्र यापूर्वीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. नितीश कुमार यांचा जेडीयू म्हणजे जनता दल युनायटेड पक्ष विरोधकांपैकी एक महत्वाचा पक्ष आहे. पण नितीश कुमार यांनी विरोधकांना पाठ दाखवल्याने विरोधकांमध्येच फूट पडल्याचं चित्र आहे. तर रामनाथ कोविंद यांचं राष्ट्रपती होणं आणखीच सोपं झालं आहे. एनडीएचा मार्ग सोपा, विरोधकांची अडचण नितीश कुमार यांनी एनडीएला पाठिंबा दिल्याने मोदींविरोधात रणनिती आखत असलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि आरजेडी नेते लालू प्रसाद यादव यांच्या नियोजनात फूट पाडली आहे. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांचं एकत्र सरकार आहे. मात्र नितीश कुमार यांच्या या निर्णयाने लालू प्रसाद यादव यांची अडचण झाली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात 17 विरोधी पक्षांची बैठक तर होणार आहे. मात्र विरोधकांकडे राष्ट्रपती निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक संख्याबळ उरलेलं नाही. त्यामुळे विरोधक मतांची जुळवाजुळव करण्यासाठी काय करणार, त्याकडे लक्ष लागलं आहे. मतांची आकडेवारी काय सांगते? एनडीएकडे राष्ट्रपती निवडणूक जिंकण्यासाठी सध्या 5 लाख 32 हजार मतं आहेत. ओडिशातील सत्ताधारी पक्ष बीजेडीनेही रामनाथ कोविंद यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. बीजेडीकडे 37 हजार 257 मतं आहेत. एनडीएला दक्षिणेकडील दोन प्रमुख पक्ष वायएसआर काँग्रेस आणि टीआरएसनेही पाठिंबा दिला आहे. तर नितीश कुमार यांची 20 हजार 779 मतंही एनडीएच्या खात्यात जमा झाले आहेत. म्हणजेच एनडीएकडे एकूण 6 लाख 29 हजार 658 मतं आहेत. तर निवडणूक जिंकण्यासाठी 5 लाख 49 हजार 422 मतांची गरज आहे. म्हणजेच एनडीएकडे बहुमतापेक्षाही जास्त मतं आहेत. काँग्रेसची रणनिती अयशस्वी? काँग्रेसच्या नेतृत्वात आज होणाऱ्या 17 विरोधी पक्षांच्या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीवर विचारमंथन तर केलं जाईल. मात्र विरोधकांकडे पुरेसे पर्याय नसतील. कारण शिवसेनेला वळवण्यात काँग्रेसला अगोदरच अपयश आलं आहे. तर बसपा अध्यक्षा मायावती बैठकीत सहभागी होणार असल्या तरीही त्यांनी दलित चेहरा म्हणून रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पण विरोधकांनी रामनाथ कोविंद यांच्यापेक्षा मोठा दलित चेहरा दिल्यास मायावती त्यांचा निर्णय बदलूही शकतात. मोदी-शाह यांच्या मास्टरस्ट्रोकने काँग्रेसची अडचण केली आहे. कारण राष्ट्रपतीपदाचा उमेदवार देण्यासाठी विरोधकांकडे काही मोजकेच पर्याय आहेत. हरित क्रांतीचे जनक एस. एस. स्वामीनाथन, माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार, माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे किंवा गोपाल कृष्ण गांधी यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांकडून पुढे केलं जाऊ शकतं. राष्ट्रपतीपदासाठी डाव्यांची प्रकाश आंबेडकरांना पसंती राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून डाव्या पक्षांची पहिली पसंती प्रकाश आंबेडकर यांना आहे. आज होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीत सीपीएम प्रकाश आंबेडकरांचं नाव मांडणार आहे. काँग्रेस आणि इतर उरलेलल्या पक्षांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नावावर सहमती दिली, तर तेच विरोधी पक्षांतर्फे राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार असतील, असे सीपीएमच्या नेत्यांनी सांगितले. पेशाने वकील असलेले प्रकाश आंबेडकर हे भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष आहेत. राजकारण आणि समाजकारणाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेवर खासदार म्हणूनही निवडून गेले होते. त्यांची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे ते घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला

व्हिडीओ

Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
Embed widget