एक्स्प्लोर
राष्ट्रपती निवडणुकीत आमदार-खासदार या खास पेनाने मतदान करणार!
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 10 ते 5 या वेळेत संसद भवन आणि विधानसभांमध्ये खासदार आणि आमदार मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीत एका खास पद्धतीने तयार करण्यात आलेल्या पेनाने मतदान करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 10 ते 5 या वेळेत संसद भवन आणि विधानसभांमध्ये खासदार आणि आमदार मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीत एका खास पद्धतीने तयार करण्यात आलेल्या पेनाने मतदान करण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाने एका खास पेनाने मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. मतदान करताना मतदाराला निवडणूक अधिकारी हा पेन देईल आणि याच पेनाने मतदान करावं लागेल.
या निवडणुकीत मतदान करण्यासाठी आपला स्वतःचा पेन मतदान केंद्रामध्ये घेऊन जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. विशेष पद्धतीने डिझाईन करण्यात आलेल्या या पेनाने मतपत्रिकेद्वारे मतदान करता येईल. राष्ट्रपती निवडणूक गोपनीय मतपत्रिकेद्वारे घेतली जाते. यामध्ये कोणताही पक्ष त्यांच्या सदस्यांना एका ठराविक उमेदवाराला मतदान करण्यासाठी व्हीप जारी करु शकत नाहीत.
दुसऱ्या पेनाने मतदान केल्यास ते मत बाद केलं जाऊ शकतं. निवडणुकीनंतर भविष्यात वाद उद्भवू नयेत यासाठी निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारशीनंतर हा पेन वापरण्याचा निर्णय घेतला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement