एक्स्प्लोर

ऑस्ट्रेलियाहून माहेरी आलेल्या गर्भवतीची हत्या, कालव्यात मृतदेह आढळला, पतीवर गुन्हा

पंजाबमधील भाकरा कालव्यात सोमवारी पोलिसांना 29 वर्षीय रवनीत कौरचा मृतदेह आढळला होता. ऑस्ट्रेलियामध्ये पतीसोबत राहणारी रवनीत काही दिवसांपूर्वी माहेरी आली होती.

मुंबई : ऑस्ट्रेलियाहून माहेरी आलेल्या 29 वर्षीय नर्सचा मृतदेह पंजाबमधील कालव्यात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हत्येच्या संशयातून पोलिसांनी तिच्या एनआरआय पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मृत्यूच्या वेळी ती गरोदर होती. पंजाबमधील भाकरा कालव्यात सोमवारी पोलिसांना 29 वर्षीय रवनीत कौरचा मृतदेह आढळला होता. फिरोजपूरपासून आठ किलोमीटरवरील बग्गे की पीपल गावात रवनीतचं माहेर होतं. ऑस्ट्रेलियामध्ये पतीसोबत राहणारी रवनीत काही दिवसांपूर्वी माहेरी आली होती. 14 मार्चला घराजवळून ती बेपत्ता झाली होती. रवनीतचे वडील हरविंदर सिंग यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिचा पती जसप्रित सिंगविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जसप्रीत मूळ चंदिगढचा रहिवासी असून कामानिमित्त तो ऑस्ट्रेलियाला स्थायिक आहे. 2013 मध्ये रवनीत आणि जसप्रीत यांचा विवाह झाला होता. त्यांना साडेचार वर्षांची मुलगी असून रवनीत पुन्हा गरोदर होती. 'जसप्रीतचे ऑस्ट्रेलियात किरण नावाच्या तरुणीशी विवाहबाह्य संबंध होते. रवनीतने वारंवार विनवण्या करुनही जसप्रीत ऐकत नव्हता. अखेर त्याने आपल्या प्रेयसीच्या मदतीने रवनीतच्या हत्येचा कट रचला' असा दावा रवनीतच्या वडिलांनी केल्याचं पोलिसांनी सांगितलं. जसप्रीत ऑस्ट्रेलियातच राहिला, मात्र किरण रचलेला कट पूर्ण करण्यासाठी भारतात आली. 14 मार्चला रवनीत पतीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असताना घराबाहेरुन तिचं अपहरण करण्यात आलं. अपहरणकर्त्यांनी रवनीतचा गळा दाबला आणि तिची हत्या करुन मृतदेह कालव्यात फेकला, असंही रवनीतच्या वडिलांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget