एक्स्प्लोर
संसदेच्या संरक्षण सल्लागार समितीवरून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची हकालपट्टी,
लोकसभेत नथुराम गोडसेबाबतचं विधान भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांना चांगलाच महागात पडला आहे. विरोधकांनी ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध करीत भाजप सरकारला धारेवर धरल्यानंतर प्रज्ञा यांच्यावर भाजपाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
![संसदेच्या संरक्षण सल्लागार समितीवरून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची हकालपट्टी, pradnya thakur removed from the parliamentary committee of the ministry of defense संसदेच्या संरक्षण सल्लागार समितीवरून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची हकालपट्टी,](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/11/28142833/pradnya-new.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भोपाळच्या भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संसदेच्या संरक्षण सल्लागार समितीवरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. लोकसभेत नथुराम गोडसेबाबतचं विधान भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांना चांगलाच महागात पडला आहे. विरोधकांनी ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध करीत भाजप सरकारला धारेवर धरल्यानंतर प्रज्ञा यांच्यावर भाजपाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रज्ञा सिंह यांचे वक्तव्य चूकीचे असून संसदेचा कार्यकाळादरम्यान असे विधान करणे निंदनिय आहे. भाजपाकडून अशा वक्तव्यांचं कधीही समर्थन केले जाणार नाही, असे भाजपाचे संसदेमधील कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले. तसेच प्रज्ञा सिंह यांना संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीमधूनही काढून टाकण्यात येणार असल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच यादरम्यान होणाऱ्या संसदेच्या दलाच्या बैठकीला देखील त्या उपस्थित राहणार नाही.
प्रज्ञा सिंह यांच्या वादग्रस्त सततच्या वादग्रस्त विधानांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, प्रज्ञा सिंह यांना कधीच माफ करणार नाही. साध्वी यांच्या आताच्या विधानावर काँग्रेसने देखील टीका केली आहे. आता देश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला माफ करणार नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.
लोकसभेत एसपीजी बिलावर चर्चा सुरु असताना प्रज्ञा साध्वीनं महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा देशभक्त असा उल्लेख केला. यावरुन लोकसभेत एकच गदारोळ उडाला. विरोधी पक्षांनी प्रज्ञा ठाकूर यांच्या या वक्तव्यानंतर संताप व्यक्त करीत भाजप सरकारचा निषेध नोंदविला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)