एक्स्प्लोर

जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य योजनेचा शुभारंभ, 'आयुष्मान भारत'चा लाभ कसा घ्याल?

पैसे नसल्याने उपचारांपासून वंचित राहणं ही भारतातील एका मोठ्या वर्गाची समस्या आहे. या समस्येसोबत लढण्यासाठीच केंद्र सरकारने आयुष्मान भारत ही योजना आणली आहे.

रांची : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांचीतून जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. पंतप्रधान जन आरोग्य योजना (पीएमजएवाय) म्हणजेच आयुष्मान भारत या योजनेंतर्गत देशातील दहा कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना म्हणजेच जवळपास 50 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येला या योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेमुळे लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचं विमा संरक्षण मिळेलं, ज्यामध्ये अनेक महत्त्वाचे उपचार करता येतील. मोदींनी यावर्षी स्वातंत्र्य दिनाला लालकिल्ल्यावरील भाषणातून या योजनेची घोषणा केली होती. आज शुभारंभ केलेल्या या योजनेची अंमलबजावणी 25 सप्टेंबरपासून होईल. भारतात आरोग्य सेवा क्षेत्रात नवनवीन तंत्र विकसित होत असली तरी देशातील एक मोठा वर्ग या सेवांपासून आणि उपचारांपासून वंचित आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये योग्य उपचार मिळत नाही आणि खाजगी रुग्णालयांचा खर्च गरीबांना झेपत नाही. सरकारी पातळीवरुन सातत्याने प्रयत्न करण्यात येतात, मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे हे आव्हानात्मक काम बनत चाललं आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून मोदी सरकारने आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आणली आहे. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात आरोग्यावर जीडीपीच्या 1.13 टक्के खर्च केला जातो. तर हाच आकडा चीनमध्ये 2.45 टक्के आणि थायलंडमध्ये 2.90 टक्के एवढा आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार, ग्रामीण भागातील 85.9 टक्के आणि शहरी भागातील 82 टक्के लोकसंख्येकडे कोणतंही आरोग्य विमा संरक्षण नाही. पैसे नसल्यामुळे देशात दरवर्षाला 66 लाख भारतीयांना उपचार घेणं शक्य होत नाही, ज्यामुळे ते विविध आजारांचा सामना करतात. तर ग्रामीण भागातील 24.9 टक्के शहरी भागातील 18.2 टक्के गरीब कुटुंबांना रुग्णालयाच्या खर्चासाठी कर्ज घ्यावं लागतं. दुर्दैवी बाब म्हणजे देशातील 17.3 टक्के लोकसंख्येला त्यांच्या एकूण कमाईचा 10 टक्के खर्च फक्त आरोग्यावर करावा लागतो, ज्यामुळे गरीबी कधीही पाठ सोडत नाही. कोण आहेत योजनेचे लाभार्थी? 2011 च्या सामाजिक, आर्थिक जनगणनेनुसार, ग्रामीण भागातील 8.3 कोटी आणि शहरी भागातील 2.33 कोटी कुटुंबाचा यामध्ये समावेश आहे. जवळपास 50 कोटी जनतेला या योजनेचा फायदा होईल. नॅशनल हेल्थ एजन्सीने (एनएचए) राष्ट्रीय आरोग्य विमा अंतर्गत आयुष्मान भारत आरोग्य योजनेची वेबसाईटही लाँच केली आहे, ज्याअंतर्गत आपण या योजनेचे लाभार्थी आहोत का, याची पडताळणी करता येईल. वेबसाईटसोबतच एक फोन नंबरही देण्यात आला आहे, शिवाय रुग्णालयांमध्ये आयुष्मान मित्र असतील, जे लाभार्थ्यांना मार्गदर्शन करतील. तुमचं नाव कसं शोधाल? या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात की नाही, हे पाहण्यासाठी एनएचएच्या वेबसाईटवर जावं लागेल. https://mera.pmjay.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाका. किंवा 14555 या क्रमांकावर फोन करुनही माहिती घेऊ शकता. वेबसाईटवर नाव पाहताना तुमच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी लागेल, ज्यानंतर एक ओटीपी येईल. ओटीपीने पडताळणी केल्यानंतर कोणत्याही कागदपत्रांविना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण होईल. एसईसीसीच्या डेटाबेसनुसार, पात्रता ठरवण्यात आली आहे. ग्रामीण भागातील श्रेणीमध्ये (डी1, डी2, डी3, डी4, डी5, डी6 आणि डी7) यांचा समावेश आहे. तर शहरी भागामध्ये व्यवसायानुसार मापदंड निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये कचरा उचलणारे, भिकारी, घरकाम करणारे, बुट पॉलिश करणारे, फेरीवाले किंवा रस्त्यावर सेवा देणारे, बांधकाम कामगार, सफाई कामगार, वेल्डर, सुरक्षा रक्षक, कुली यांचा यामध्ये समावेश आहे. आयुष्मान मित्रही मदत करणार पंतप्रधान जन आरोग्य योजना (पीएमजएवाय) या योजनेची माहिती देण्यासाठी आणि लागेल ती मदत करण्यासाठी रुग्णालयांमध्ये आयुष्मान मित्र नियुक्त करण्यात आले आहेत. जे रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करतील. देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी 29 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी ही योजना स्वीकारली आहे. त्यामुळे राज्य सरकारची यामध्ये महत्त्वाची भागीदारी असेल. सुरुवातीला अरुणाचल प्रदेश, चंदीगड, छत्तीसगड, दादरा आणि नगर हवेली, दमन आणि दीव, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर आणि गोवा या राज्यांमधील 1280 रुग्णालयांमध्ये सुरुवातीला ही योजना सुरु होईल. आज ही योजना लाँच होत असली तरी 25 सप्टेंबरला पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीपासून या योजनेची अंमलबजावणी होईल. कोणत्या रुग्णालयात उपचार होणार? गरीब रुग्णांना आता खाजगी रुग्णालयातले उपचार घेणंही शक्य होणार आहे. कारण, या योजनेंतर्गत अनेक खाजगी रुग्णालयांचाही समावेश असेल. आतापर्यंत 15 हजारांपेक्षा जास्त सरकारी आणि खाजगी रुग्णालयांनी या योजनेत सहभागी करुन घेण्यासाठी अर्ज केला आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार केल्यानंतर विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी आयुष्मान मित्र मदत करतील. रुग्ण भरती करुन घेण्यापासून ते त्याला विम्याची रक्कम मिळवून देण्यापर्यंतची जबाबदारी आयुष्मान मित्राची असेल. आयुष्मान भारत योजनेचा लाभ काय? या योजनेंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या 10 कोटी कुटुंबांना दरवर्षी उपचारासाठी पाच लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळेल. एका कुटुंबात किती सदस्य असावेत याची मर्यादा नाही. देशातील दीड लाख गावांमध्ये आरोग्य केंद्र सुरु केले जातील, जिथे फक्त उपचारच होणार नाही, तर नियमित तपासणीही केली जाईल. ही योजना राष्ट्रीय आरोग्य विमा योजना आणि ज्येष्ठ नागरिक विमा योजनेची जागा घेईल. विमा संरक्षणासाठी वयाची कोणतीही अट नाही. अगोदरपासून असलेल्या आजारांचाही यामध्ये समावेश होईल. ही योजना कॅशलेस असेल, म्हणजेच रुग्णाने उपचार घेतल्यानंतर पैसे थेट रुग्णालयाला दिले जातील. योजनेत 1350 वैद्यकीय सेवांचा समावेश

महत्त्वाच्या बातम्या

बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget