Congress Rally: तेलंगणामधील काँग्रेसच्या सभेत सोनिया गांधींचे 'भारतमाते'च्या रुपात बॅनर्स
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना सभास्थळी लावण्यात आलेल्या बॅनर्सवर भारतमातेच्या रुपात दाखवण्यात आले होते. या बॅनरवर काँग्रेस मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह पक्षाच्या अन्य नेत्यांचे फोटो होते.
रंगारेड्डी (तेलंगणा) : तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात तुक्कुगुडामध्ये रविवारी काँग्रेसची भव्य रॅली पार पडली. या रॅलीत लावण्यात आलेल्या बॅनर्सने चांगलेच लक्ष वेधले. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना सभास्थळी लावण्यात आलेल्या बॅनर्सवर भारतमातेच्या रुपात दाखवण्या आले होते. या बॅनरवर काँग्रेस मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह पक्षाच्या अन्य नेत्यांचे होर्डिंग्ज लावण्यात आले होते. विराट रॅलीसह हैदराबादमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याव्यतिरिक्त प्रदेश काँग्रेस कमिटी (पीसीसी) अध्यक्ष, विधिमंडळ पक्षाचे नेते आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
'जिंकण्यासाठी लढावं लागेल'
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीबाबत बोलताना काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, " या दोन दिवसीय बैठकीत एक स्पष्ट अजेंडा ठेवण्यात आला होता. आम्हाला 2024 मध्ये भाजपला हटवायचं आहे." यावेळी काँग्रेस कार्यकारी समितीकडून देशभरातील कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले. ते म्हणाले की, "आता विश्रांती न घेता, जिंकण्यासाठी लढावे लागेल. जोपर्यंत विधानसभा निवडणुकांचा संबंध आहे, आम्हाला खात्री आहे की आम्ही पाचही राज्यांमध्ये सरकार स्थापन करू." समितीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेत्या अंबिका सोनी म्हणाल्या की, "इंडिया आघाडीवर चर्चेचा विषय अजेंड्यावर नव्हता, परंतु प्रत्येकाने निवडणूक लढवण्याबद्दल आपले मत दिले."
दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत 14 प्रस्ताव मांडण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. यामध्ये वाढती बेरोजगारी आणि महागाईवर देखील चर्चा करण्यात आली. तसेच मणिपूरमधील परिस्थितीविषयी देखील दु:ख या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आलं. दरम्यान या बैठकीमध्ये जातीय जनगणना करण्याची तसेच दलित, आदिवासी आणि ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Congress has problem with 'Bharat Mata' but Posters showing Sonia Gandhi as Bharat Mata were put up in Telangana. pic.twitter.com/FtzaasGjlS
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) September 17, 2023
'काँग्रेस पुनरागमन करेल'
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते डीके शिवकुमार म्हणाले की, "ही बैठक खूप अर्थपूर्ण होती. ती तेलंगणाचा चेहरा बदलेल, भारताचा चेहरा बदलेल. आम्ही देशाला आश्वासन दिले आहे की काँग्रेस पुनरागमन करेल."
नेत्यांनी जनतेशी संपर्क ठेवावा
तत्पूर्वी, बैठकीच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षश्रेष्ठींना जनतेच्या संपर्कात राहून विरोधी पक्षांकडून पसरवलेल्या खोट्या गोष्टींना तोंड देण्याचे आवाहन केले. त्याचवेळी राहुल गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांना भाजपच्या फंदात न पडता जनतेचे प्रश्न मांडण्यास सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या